शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नागपूरच्या मनोरुग्णालयातही कोरोनाचा शिरकाव; महिला रुग्णाला लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 11:23 IST

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका महिला रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे१०० रुग्ण, कर्मचारी, परिचारिका व डॉक्टरांची चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका महिला रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्याने खळबळ उडाली. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मनोरुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून बुधवारी मनोरुग्णालयातील १०० वर मनोरुग्ण, कर्मचारी, परिचारिका व डॉक्टरांची तपासणी करण्यात आली.

अनोळखी मनोरुग्ण म्हणून ६० वर्षीय या महिलेला १३ जानेवारी रोजी नागपूरच्या मनोरुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. उपचारानंतर तिच्यात बराच सुधार झाला. रुग्णालय प्रशासनाने तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितलेल्या गोरखपूर येथील पत्त्यावरील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. नातेवाईक मार्च महिन्यात तिला घेऊन जाणार होते, परंतु याच दरम्यान लॉकडाऊन लागले. यामुळे ती रुग्णालयातच राहिली.

गेल्या काही दिवसापासून तिची प्रकृती खालावली होती. आजाराचे निदान करण्यासाठी २४ जुलै रोजी महिलेला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. साधारण दोन तास मेडिकलमध्ये होती. येथेच तिला कोरोनाची लागण झाली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मेडिकलच्या डॉक्टरांनी जाँडिस असल्याचे निदान करीत पुन्हा मनोरुग्णालयात पाठविले. रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ आॅगस्ट रोजी तिची प्रकृती ढासळली. पुन्हा मेडिकलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिची लक्षणे पाहत कोविडची चाचणी केली. मंगळवारी रात्री उशिरा अहवाल पॉझिटिव्ह येताच मनोरुग्णालय प्रशासन हादरले. मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी तातडीने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व काही रुग्ण असे १०० लोकांची बुधवारी चाचणी केली. यातील काही जणांना सात दिवसासाठी क्वारंटाईन केल्याचे डॉ. थोरात यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस