शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CoronaVirus in Nagpur : नागपुरातील सीए रोड, हावरापेठमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 23:33 IST

रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. आज ते स्वत:हून मेयोमध्ये दाखल झाले. सामाजिक कार्य करताना कोरोनाबधित होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नागपुरात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एक रुग्ण हावरापेठ या नव्या वसाहतीमधील आहे. रुग्णांची संख्या ४३३ झाली आहे.

ठळक मुद्देपुन्हा चार रुग्णांची नोंद : सामाजिक कार्य करताना डॉक्टर पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रमजानचा महिना असल्याने एका डॉक्टरने खासगी हॉस्पिटलमधून सुटी घेऊन गोरगरिबांना सेवा दिली. याच दरम्यान त्यांनी सीए रोडवरील भिकाऱ्यालाही तपासले. तीन दिवसापूर्वी तो भिकारी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून डॉक्टरने खासगी लॅबमधून नमुना तपासला असता सोमवारी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आला. आज ते स्वत:हून मेयोमध्ये दाखल झाले. सामाजिक कार्य करताना कोरोनाबधित होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नागपुरात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील एक रुग्ण हावरापेठ या नव्या वसाहतीमधील आहे. रुग्णांची संख्या ४३३ झाली आहे. रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमधील ४० वर्षीय डॉक्टर कार्यरत आहे. रमजान निमित्त लोकांची सेवा करण्यासाठी काही दिवसापूर्वी त्यांनी सुटी घेतली. मोमीनपुरा, सतरंजीपुरा वसाहतीत जाऊन रुग्णांची सेवा दिल्याचेही समजते. एवढेच नव्हे तर क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन संशयित रुग्णांचे समुपदेशनही ते करीत होते. काही दिवसापूर्वी सीए रोडवरील एका भिकाऱ्याची प्रकृती खालावल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याची तपासणी करून औषधे दिली. परंतु जेव्हा एका पोलिसाने त्या भिकाऱ्याला मेयोत दाखल करून चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आला तेव्हा डॉक्टरने खासगी प्रयोगशाळेतून नमुना तपासून घेतला. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या तीन झाली आहे. डॉक्टर सीए रोडच्या परिसरात राहतात. यामुळे बुधवारी हा परिसर सील होण्याची शक्यता आहे.बुटीबोरीत पुन्हा एका रुग्णाची नोंद२३ मे रोजी मुंबईहून बुटीबोरी आपल्या स्वगृही परतलेल्या २७ वर्षीय मुलापासून त्याचे ५२ वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या घरातील सदस्यांचे नमुने तपासले असता २३ वर्षीय मुलीचा नमुना आज पॉझिटिव्ह आला. या तिघांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. मेयोच्या प्रयोगशाळेने तपासलेल्या नमुन्यात दोन पॉझिटिव्ह आले. यात एक मोमीनपुरा येथील तर एक टिपू सुलतान चौक, राणी दुर्गावतीनगर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाईन होते. या शिवाय हावरापेठ आेंकारनगर येथील ५७ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली. या रुग्णाने खासगी प्रयोगशाळेत नमुने तपासले होते. पहिल्यांदाच हावरापेठमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या रुग्णाला कुठून लागण झाली याची माहिती घेतली जात आहे.मेयो, मेडिकलमधील ७६ मधून ७० रुग्णांना लक्षणेच नाहीतकोविड रुग्णांच्या नव्या डिस्चार्ज धोरणानुसार मागील काही दिवसात मोठ्या संख्येत रुग्णांना सुटी देण्यात आली. यामुळे सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये २६ तर मेडिकलमध्ये ५० असे एकूण ७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ७० रुग्णांना कुठलीच लक्षणे नाहीत. केवळ ६ रुग्णांना लक्षणे असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज मेयोमधून संतोषीनगर नारा येथून एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३५७ झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १२९दैनिक तपासणी नमुने २००दैनिक निगेटिव्ह नमुने १९७नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४३३नागपुरातील मृत्यू ०८डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३५७डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २४८६क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १६८१पीडित-४३३-दुरुस्त-३५७-मृत्यू-८

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर