शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील टपाल कार्यालयांमध्ये कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:23 IST

नागपूर शहरातील पोस्टाची सर्व कार्यालये कोरोनाच्या विळख्यात सापडली असून दोन कर्मचाऱ्यांचा आजाराने बळी घेतला आहे.

ठळक मुद्देसुरक्षेचे उपाय करण्याची मागणीकर्मचारी दहशतीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. यातून डाक विभागही सुटलेला नाही. शहरातील पोस्टाची सर्व कार्यालये कोरोनाच्या विळख्यात सापडली असून दोन कर्मचाऱ्यांचा आजाराने बळी घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून कर्मचाऱ्यांना सुविधा आणि सुरक्षेचे उपाय करण्याची मागणी केली जात आहे.

शहराच्या विविध झोनमध्ये असलेल्या टपाल कार्यालयांमध्ये ४० च्यावर कर्मचारी कोविड-१९ ने संक्रमित झाले आहेत. अयोध्यानगर पोस्ट आॅफिसमध्ये सर्वाधिक १९ कर्मचारी कोविड संक्रमित आढळून आले असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय महात्मा फुले बाजार कार्यालयाचा एक कर्मचारी कोरोनाने दगावला आहे. सिव्हिल लाईन्सच्या जीपीओ कार्यालयात सर्वात आधी एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आली होती. विशेष म्हणजे तिचा अहवाल येईपर्यंत ती कार्यालयात उपस्थित होती. मात्र त्यानंतरही डाक विभागातर्फे थातूरमातूर उपाय करण्यात आले. आज या कार्यालयात ७ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. चिंताजनक म्हणजे यामध्ये पोस्टमनचाही समावेश आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय करण्यासह शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पोस्टल कर्मचारी संघटनेचे (एनएपीई) सचिव धनंजय राऊत यांनी निवेदनातून सादर केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस