शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पॅरोल मिळणे कैद्याचा अधिकार नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 01:46 IST

कारागृहात कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता राज्य सरकारने विशिष्ट कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी ८ मे २०२० रोजी जीआर जारी केला; परंतु त्याअंतर्गत कैद्याला कोरोनामुळे पॅरोल मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही.

ठळक मुद्देकारागृहात कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता राज्य सरकारने विशिष्ट कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी ८ मे २०२० रोजी जीआर जारी केला

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे पॅरोल मिळणे कैद्याचा अधिकार नाही. कैद्याला कोरोनामुळे पॅरोल द्यायचा किंवा नाही ही बाब कारागृह अधीक्षकांच्या विवेकाधिकारावर अवलंबून आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी दिला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी अय्याज खानने ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार कोरोनामुळे पॅरोल मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. कारागृह अधीक्षकांनी १९ ऑक्टोबर २०२० राेजी तो अर्ज फेटाळल्यामुळे खानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर हा निर्णय दिला. 

कारागृहात कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता राज्य सरकारने विशिष्ट कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी ८ मे २०२० रोजी जीआर जारी केला; परंतु त्याअंतर्गत कैद्याला कोरोनामुळे पॅरोल मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही. कैद्याला पॅरोल मंजूर करायचा किंवा नाही ही बाब कारागृह अधीक्षकांच्या विवेकाधिकारावर अवलंबून असून यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी कारागृह अधीक्षकांनी कारागृहातील कोरोनाची परिस्थिती, कारागृहातील कोरोनाबाधित कैदी, कारागृहात शारीरिक अंतर पाळता येणे शक्य आहे की नाही, कैदी कमी करण्याची गरज आहे का, कैदी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर जेथे जाणार आहे, तेथे कोरोनाची परिस्थिती कशी आहे आदी मुद्दयांचा विचार करणे अपेक्षित आहे. परिणामी, कैदी अधिकार म्हणून कोरोनामुळे पॅरोलची मागणी करू शकत नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले. तसेच, खानच्या अर्जावर सर्व बाबींचा सारासार विचार करून नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश कारागृह अधीक्षकांना दिले.

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या