कोरोना महामारी : महिलांनी घातले गणपतीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:18 PM2020-06-18T21:18:18+5:302020-06-18T21:20:53+5:30

कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच, भगवंताला साकडे घालून जगाला कोरोनामुक्त करण्याची हृदयी याचना नागपुरातील महिलांनी गुरुवारी केली.

Corona epidemic: Women worshiped Ganpati | कोरोना महामारी : महिलांनी घातले गणपतीला साकडे

कोरोना महामारी : महिलांनी घातले गणपतीला साकडे

googlenewsNext
ठळक मुद्देकण्वाश्रमतर्फे घरोघरी अथर्वशीर्षाची २१ आवर्तने

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे अवघ्या जगात हाहाकार माजला आहे. त्यामुळेच, भगवंताला साकडे घालून जगाला कोरोनामुक्त करण्याची हृदयी याचना नागपुरातील महिलांनी गुरुवारी केली.
महाल येथील कण्वाश्रमच्या महिला मंडळाने गुरुवारी श्रीगणेशाला साकडे घालत अथर्वशीर्ष पाठाची २१ आवर्तने करण्याचा संकल्प केला होता. त्याअनुषंगाने महिला मंडळाने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे म्हणून आपापल्या घरातून एकाच वेळी आवर्तने करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने संध्याकाळी ५ वाजता अथर्वशीर्षाच्या आवर्तनास सुरुवात झाली आणि संध्याकाळी ६.३० वाजता एकसाथ घरातूनच या महिलांनी आवर्तने पूर्ण केली. जगाला कोरोनामुक्त करत पुन्हा एकदा नंदनवन फुलू दे अशी प्रार्थना श्री गणपती चरणी करण्यात आली. ही आवर्तने गुरु जयश्री (माई) खांडेकर यांच्या मार्गदर्शनात सुजाता काथोटे, दर्शना नखाते, सुवर्णा खर्डेनवीस, रागिणी खर्डेनवीस, डॉ. मंगला देशपांडे, श्रद्धा महाशब्दे, संगीता मस्के, विद्या मस्के, राणी अरमरकर, पिंकी काथोटे, सुनिता पितळे, संध्या पोफळी, सोनाली पितळे, वसुधा अरमरकर, ज्योती हरडे, अश्विनी वाघमारे, मंगला खर्डेनवीस, गार्गी धनोटे, देवयानी धनोटे यांनी पूर्ण केली.

Web Title: Corona epidemic: Women worshiped Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.