शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात खाल्ले जातेय 'टाळूवरचे लोणी'; सार्वजनिक बांधकाम विभागातील गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:30 IST

जो कंत्राटदार (वि.डी. कन्स्ट्रक्शन) निविदेविना कोणतेही एक काम शंभर रुपयात करत होता, तोच आता निविदा टाकून तेच काम ४० रुपयात करायला तयार झाला आहे. त्यामुळे विना निविदा नागरिकांना का आणि कोणी लुटले, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएक महिन्यानंतर ६० टक्के पर्यंत केली खर्चात कपात

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमदार निवासातील कोरोना क्वारान्टीन सेंटरच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागातील डिव्हिजन नंबर एक च्या अधिका?्यांवर टाळूवरचे लोणी खाल्ले जात असल्याचा आरोप लावला जात आहे. जो कंत्राटदार (वि.डी. कन्स्ट्रक्शन) निविदेविना कोणतेही एक काम शंभर रुपयात करत होता, तोच आता निविदा टाकून तेच काम ४० रुपयात करायला तयार झाला आहे. त्यामुळे विना निविदा नागरिकांना का आणि कोणी लुटले, असा सवाल उपस्थित होत आहे.'लोकमत'ला प्राप्त झालेल्या दस्ताऐवजात हा सगळा घोळ उघडकीस येत आहे. जलापूर्ती, हाऊस किपिंग, सॅनिटायझेशन आणि साहित्य पुरवठ्याच्या नावावर पीडब्लूडी डिव्हिजन नंबर एकने 'आंधळा दळण दळतो आणि कुत्रा पीठ खातो' ही म्हण खरी करवून दाखवली आहे.जिल्हा प्रशासनाने १२ मार्च पासून आमदार निवासाला क्वारान्टीन सेंटर बनविले आहे. येथे विदेशातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसासाठी ठेवण्यात येऊ लागले. आमदार निवासाचे व्यवस्थापन पीडब्लूडी कडे असल्याने विपदा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सेंटर मध्ये असणाऱ्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची आदी जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी पीडब्लूडी वर सोपवली. त्याअनुषंगाने पीडब्लूडी ने १३ मार्चला एक महिन्याकरिता सिलेक्टिव्ह टेंडर काढला. यात जलापूर्ती करीता ३० लाख, हाऊस किपिंग करिता ४८ लाख, सॅनिटायझेशन साठी २८ लाख आणि साहित्य पुरावठ्या करिता २८ लाख रुपये खर्च करण्यात आले. एक महिन्यानंतर निविदा प्रक्रियेत हे सर्व काम तोच कंत्राटदार ४० ते ६० टक्के कमी दरावर करण्यास तयार झाला. यावरून कोरोनाच्या नावावर संकटाच्या काळात खालपासून ते वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी टाळूवरचे लोणी खाल्ल्याचे स्पष्ट होते.३० दिवसाचे कंत्राट ४५ दिवस चाललेजिल्हाधिकारी यांच्या निदेर्शानुसार आमदार निवासाच्या वार्षिक देखभालीचा कंत्राट रद्द करून नव्याने ३० दिवसासाठी सेलेक्टिव टेंडर जारी केल्याचे पीडब्लूडी कडून सांगण्यात आले. ओपन टेंडर जारी झाले असले तरी सेलेक्टिव टेंडर ४५ दिवसापर्यंत चालु ठेवण्यात आले.कोरोनामुळे ज्यादा दरज्यादा दरासाठी पीडब्लूडी ने कोरोना विषाणूलाच जबाबदार ठरवले आहे. या प्रकरणाशी जुळलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या दहशतीमुळे कुणीच काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे जास्तीच्या दरात काम करवून घ्यावे लागत होते. यावरून गोंधळ कारभार स्पष्ट होतो. जेव्हा निविदेच्या माध्यमातून कोरोना संदभार्तील कामे सोपविण्यात आली तोवर कोरोनाशी निगडित आपात कल संपला होता का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ह्यरूम सर्विसह्णसाठी सुद्धा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती, असा दावा पीडब्लूडी कडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग