शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

नागपुरात शहरभर कोरोना वाहक : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 21:41 IST

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली.

ठळक मुद्देठिकठिकाणी हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, पानटपऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु, गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली. ही बेजबाबदार कृती संपूर्ण समाजाला संकटात ओढणारी आहे. त्यामुळे अशा कोरोना वाहकांवर तातडीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरभर गस्त घातली तरच, हे शक्य होणार आहे.

लिंबूपाणी, उसाचा रस घातकलिंबूपाणी व उसाच्या रसामध्ये बर्फ मिसळवला जातो. कोरोना विषाणू थंड परिस्थितीत अधिक काळ जिवंत राहतो व फोफावतो. त्यामुळे लिंबूपाणी व उसाचा रस पिणे नागरिकांसाठी अधिक घातक आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले लागले आहेत. नागरिक लिंबूपाणी व उसाचा रस पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. लिंबूपाणी व उसाचा रस पिऊन झाल्यानंतर काचाचे ग्लास योग्य पद्धतीने स्वच्छ केले जात नाहीत. बादलीभर पाण्यामध्ये वारंवार ग्लास धुतले जातात. त्यातून कोरोना विषाणूचा वेगात फैलाव होऊ शकतो. प्रशासनाने ही बाब सर्वाधिक गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले तातडीने बंद केले गेले पाहिजे.
व्हीसीए स्टेडियममधील हॉटेल्स उघडेसिव्हिल लाईन्सस्थित व्हीसीए स्टेडियममधील काही हॉटेल्स अर्धवट उघडे ठेवण्यात आले होते. ग्राहकांना आत घेऊन चहा, कॉफी व खाद्य पदार्थ दिले जात होते. बडे व्यावसायिक असल्यामुळे त्यांचे फावत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोना हा संपूर्ण समाजाला संकटात ओढणारा विषाणू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, तक्रारीवरून कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला गेला पाहिजे.
वस्त्यांमध्ये सर्वाधिक दुकाने सुरूवस्त्यांमधील सर्वाधिक दुकाने सुरू होती. ही दुकाने मुख्य मार्गांवर नसल्यामुळे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे कारवाई झाली नाही. नागरिकांनी या दुकानांमध्ये बिनधास्तपणे नाश्ता केला. त्यानंतर चहा पिला व खर्रा खरेदी करून घर गाठले. बजरंगनगर, हनुमाननगर, बेसा, हुडकेश्वर, बिडीपेठ, वाठोडा, दर्शन कॉलनी, खरबी, चक्रपाणीनगर, पिपळा, विश्वकर्मानगर, अयोध्यानगर यासह अनेक वस्त्यांमध्ये हे चित्र दिसून आले.मुख्य रस्त्यांवर काटेकोर पालनमुख्य रस्त्यांवरील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन केले. गणेशपेठ बसस्थानक, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक, धरमपेठ, महाल, इतवारी, मंगळवारी, सदर, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, शिवाजीनगर, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, प्रतापनगर, खामला यासह अन्य वर्दळीच्या ठिकाणी चहा, लिंबूपाणी व उसाच्या रसाची एक-दोन दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या परिसरात गर्दीही कमी दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर