शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 10:27 IST

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने घाबरू नये. स्वत:ला क्वारंटाईन करून रोज पल्स रेट, टेम्परेचरचा चार्ट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे. हा आजार ६० वर्षांवरील व्यक्तींना जीवघेणा ठरू शकतो.

ठळक मुद्देएनव्हीसीसीतर्फे कोरोनावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. कुणाला थकवा, डोकेदुखी, जास्त घाम येणे, सर्दी, ताप, खोकला असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेण्याचे आवाहन डॉ. जय देशमुख यांनी येथे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित सेमिनारमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांना सल्ला दिला. कोरोना संसर्गापासून बचाव करण्याचे त्यांनी उपाय सांगितले. ते म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने घाबरू नये. स्वत:ला क्वारंटाईन करून रोज पल्स रेट, टेम्परेचरचा चार्ट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे. हा आजार ६० वर्षांवरील व्यक्तींना जीवघेणा ठरू शकतो. अखेर सर्वांनी नैतिक, सामाजिक जबाबदारी समजून कोरोना नियमांचे कठोरतेने पालन केले पाहिजे. तिवारी यांनी मनपातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, मनपाने सरकारी रुग्णालयासह ३२ खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी आरक्षित केले आहे. रुग्णालयात बेड, अ‍ॅम्ब्युलन्स, हेल्पलाईनची व्यवस्था केली आहे. अहिरकर म्हणाले, प्रशासनाने सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांनाही कोरोना उपचारासाठी निर्देश जारी केले आहेत. कोरोना रुग्णालयात संक्रमित रुग्णांची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. सरकारी रुग्णालयांमध्येही आदेशाचे उल्लंघन होत आहे. याकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग करण्यात यावा. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस