शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने काढले ‘स्कूल व्हॅन’चालकांचे दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:16 IST

कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेकांचा रोजगार हिरावला गेला. आता टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन्सची चाके अडकली आहेत. या सर्वांचा परिणाम केवळ शाळांवर निर्भर असलेल्या स्कूल व्हॅन चालकांचे दिवाळे निघाले आहे.

ठळक मुद्देपालक, शाळांकडून मदतीची ना : कशी चालतील कुटुंबाची चाके? टॅक्स, इन्शुरन्स, फिटनेस प्रमाणपत्रासाठी हवी एक वर्षाची मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेकांचा रोजगार हिरावला गेला. आता टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन्सची चाके अडकली आहेत. या सर्वांचा परिणाम केवळ शाळांवर निर्भर असलेल्या स्कूल व्हॅन चालकांचे दिवाळे निघाले आहे. यावर पालक, शाळा आणि शासनाकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे.टाळेबंदी शिथिल झाल्याने शाळा सुरू होण्याच्या आशेवर चालक होते. मात्र, शिथिलतेही कोरोना संक्रमणाच्या धास्तीने शाळा किमान ३१ जुलैपर्यंत बंदच असणार आहेत आणि पुढे शाळा सुरू झाल्यावरही पालक मुलांना शाळांमध्ये पाठवण्यास धजावणार नाहीत, ही स्थिती आहे. शाळांनी पालकांना मुलांचे अ‍ॅडमिशन करण्यास सांगितले आणि पालकांनी अ‍ॅडमिशन करण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, यात स्कूल व्हॅन चालकांचे शुल्क नाही. अनेक पालक ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याउलट कर्ज काढून वाहन घेतल्याने संबंधित वित्त संस्था पैशाचा तगादा लावत आहेत. हप्ते भरले नाहप्त तर वाहन जप्त करण्याची धमकीही देत आहेत. उत्पन्नच नाही तर हप्ते भरणार कसे आणि हप्ते न भरण्याच्या कारणाने वाहन जप्त होणार असेल तर जगावे कसे, असा प्रश्न स्कूल व्हॅन चालकांपुढे निर्माण झाला आहे. ही चालक मंडळी पालकांकडून दहा ते अकरा महिन्यांचे पैसे घेत असतात. त्यातून शासनाला ही मंडळी कर, इन्शुरन्स स्वरूपात २५ ते ४० हजार रुपये दरवर्षी देत असतात. वर्तमानातील संकट हे सर्व जगावर ओढवले आहे. सरकारला या स्थितीची जाणीव आहे. एकीकडे पालक व शाळांनी मदतीला ना म्हटल्याने, आमचा वाली कोण, अशा नजरेने व्हॅन चालकांनी शासनाकडे बघण्यास सुरुवात केली आहे. किमान वित्त संस्थांचे हप्ते हे संकट संपेपर्यंत थांबवावे, वाहन कर, इन्शुरन्स आणि फिटनेस प्रमाणपत्रासाठी किमान एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी अपेक्षा या स्कूल व्हॅन चालकांची आहे.सरकारने व्हॅनचालकांना दहा हजार रुपये मदत द्यावी - नितीन पात्रीकरमदतीच्या याचनेचे अर्ज स्कूल व्हॅन चालकांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहप्त. मात्र, शासनाकडून अजूनही कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. याच गंभीर संकटात एका स्कूल व्हॅन चालकाचा मृत्यूही झाला आहे. हे संकट निवळले गेले नाही तर कुटुंबीयांसह आत्महत्येचे सत्र वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, सरकारने सर्व स्तरातून सवलत देण्यासोबतच व्हॅन चालकांना किमान मासिक दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी स्कूल व्हॅन चालक नितीन पात्रीकर यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाPublic Transportसार्वजनिक वाहतूकcorona virusकोरोना वायरस बातम्या