शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमध्ये समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:27 IST

इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी ‘कॅन्सर रुग्णांच्या प्रजनन क्षमता’ विषयावर मार्गदर्शन केले. केवळ कॅन्सरमुळेच नाही तर आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पाठक यांनी अधोरेखित केले.

ठळक मुद्देकॅन्सर व प्रजनन क्षमता संवर्धनावर परिषद : इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद पाठक यांनी ‘कॅन्सर रुग्णांच्या प्रजनन क्षमता’ विषयावर मार्गदर्शन केले. केवळ कॅन्सरमुळेच नाही तर आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पाठक यांनी अधोरेखित केले. नागपूर टेस्ट ट्यूब बेबी केंद्राच्या संचालक डॉ. साधना पटवर्धन यांनी ‘प्रजनन क्षमतेचे वैद्यकीय पैलू’ विषयावर भाष्य करताना अशा रुग्णांसाठी असलेल्या क्रायोप्रिजर्वेशनच्या पर्यायावर प्रकाश टाकला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता गुप्ते व आयएफएस-व्हीसीच्या सचिव डॉ. शिल्पी सूद उपस्थित होत्या.नवी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलच्या एआरटी केंद्राचे प्रमुख व संचालक प्रा. कर्नल पंकज तलवार यांनी ‘प्रजनन क्षमता संवर्धनाचे तंत्रज्ञान’ विषयावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. प्रजनन क्षमता संवर्धन हे सामूहिक कार्य आहे. त्यासाठी कर्करोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, शुक्राणूशास्त्र तज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ एकत्र येऊन रुग्णाची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. समन्वय व समग्र दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. आयजीजीएमसीचे सहायक प्रा. डॉ. अमोल डोंगरे यांनी ‘प्रजनन क्षमता व्यवस्थापनासमोरील आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. कुटुंबीयांना या सर्व गोष्टीबाबत जाणीव देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. निर्मला वझे आणि डॉ. कालिदास परशुरामकर हे सत्राचे अध्यक्ष होते. यानंतर ‘प्रजनन क्षमता संवर्धनाबाबत सत्य आणि संभ्रम’ या विषयावर कर्करोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ व भ्रूणशास्त्र तज्ज्ञांचे पॅनल डिस्कशन घेण्यात आले. प्रा. कर्नल पंकज तलवार हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्रात डॉ. दर्शना पवार, डॉ. तनुश्री जैन, डॉ. नरेश जाधव, डॉ. अनिता साल्पेकर, डॉ. बिंदू चिमोटे हे सहभागी होते. वसुंधरा फर्टिलिटी सेंटरचे संचालक व आयएफएस-व्हीसीचे संस्थापक सदस्य डॉ. नटचंद्र चिमोटे व डॉ. ए. गंजू हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बिंदू चिमोटे यांनी सर्व परिषदेचे संचालन केले तर आयएफएस-व्हीसीचे सहसचिव डॉ. निषाद चिमोटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर