शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सहकार क्षेत्राच्या क्षमतांची दखलच घेतली गेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:38 IST

सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व केंद्र शासन तसेच धोरण ठरविणाऱ्यांनीही या क्षेत्राच्या क्षमतांची हवी तशी दखल घेतली नाही, अशी खंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली.

ठळक मुद्देसतीश मराठे : सहकार भारतीतर्फे मराठे यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहकार क्षेत्राच्या वाईट अवस्थेसाठी केवळ रिझर्व्ह बँकेला दोष देणे योग्य होणार नाही. वास्तविक या सहकारी संस्थांना त्यांच्या क्षमता, समाज क्षेत्रावरील प्रभाव आणि अर्थव्यवस्थेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करता आले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक , राज्य व केंद्र शासन तसेच धोरण ठरविणाऱ्यांनीही या क्षेत्राच्या क्षमतांची हवी तशी दखल घेतली नाही, अशी खंत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली.सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व एनडीसीसीचे संचालक सतीश मराठे यांची नुकतीच आरबीआयच्या मंडळावर नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने सहकार भारती विदर्भ प्रांताच्यावतीने त्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. शिक्षक सहकारी बँक सभागृहात झालेल्या या सत्कार समारोहात महापौर नंदा जिचकार, दि चिखली अर्बन को-आप. बँक लि.चे अध्यक्ष सतीय गुप्त, शिक्षक सहकारी बँक लि.चे अध्यक्ष आमदार अनिल सोले,   महाराष्ट्र राज्य सह. बँक लि.चे संचालक संजय भेंडे, रा. स्व. संघाच्या विदर्भ प्रांताचे सहकार्यवाह अतुल मोघे, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण प्रामुख्याने उपस्थित होते. मराठे पुढे म्हणाले, सहकारी संस्था या नफा कमाविणाऱ्या संस्था नाहीत. उलट सामाजिक विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असून अर्थव्यवस्थेत त्यांचे स्थान मोठे आहेत. राज्यात १५ हजार तर देशात साडे पाच लाख सक्रिय संस्था आहेत. सहकारी बँकासमवेत साखर कारखाने, मच्छिमार संस्था, डेअरी संस्था आदींचे रोजगार निर्मितीत मोलाचे योगदान आहे. शिवाय सामाजिक सेवाकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या गोष्टींचा वार्षिक गोषवारा तयार करणे आणि शासनासह नीती आयोग, नाबार्ड आदी धोरण ठरविणाऱ्या संस्थांसमोर ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक सहकार भारतीच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आशिष चौबिसा यांनी केले. संचालन महामंत्री विवेक जुगादे यांनी केले. बँक प्रकोष्ठ प्रमुख नीलेश जोशी यांनी आभार मानले.लवकरच संशोधन संस्थासहकारी क्षेत्राचे संशोधन व प्रशिक्षणासाठी लवकरच सहकारितेचे प्रणेते लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावे राष्ट्रीय अकादमी स्थापन केली जाणार असून फेब्रुवारी महिन्यात त्याचे उदघाट्न  होणार आहे. नवीन क्षेत्रात सहकारी संस्था वाढविणे, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या क्षमता वाढविणे व कृषी व ग्रामीण व्यवस्था मजबूत करणे, हा या अकादमीचा उद्देश असल्याचे सतीश मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूर