शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या माजी उपाध्यक्षांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 20:53 IST

Nagpur News उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा मंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल (५७, रा. कावरापेठ, उमरेड) यांच्यासह अन्य एका महिलेची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

ठळक मुद्देधार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

नागपूर : उमरेड पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा मंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल (५७, रा. कावरापेठ, उमरेड) यांच्यासह अन्य एका महिलेची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अश्लील संभाषण असून, डॉ. मुकेश मुदगल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याची बाब पुढे आली आहे. उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुदगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार महिन्यांपूर्वी महिलेसोबत मोबाईलवरून संभाषणात एका विशिष्ट धर्माविषयी अपमानजनक बोलून इतर धर्मीयांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संभाषण केल्याची बाब तक्रारीत नमूद आहे. कदीर मकबूल शेख (३९, रा. कावरापेठ, उमरेड) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी १५३ (अ), २९५ (अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर डॉ. मुकेश मुदगल यास ताब्यात घेण्यात आले होते. रात्री उशिरा अटक होण्याची संभावना व्यक्त होत आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे करीत आहेत.

याप्रकरणी तपास सुरू झाला असून डॉ. मुकेश मुदगल तसेच महिलेचेही बयाण घेतले जात आहे. एसडीआर, सीडीआर तपासणी केल्यानंतर अधिक बाबींचा उलगडा होईल.

- प्रशांत खोब्रागडे, तपास अधिकारी

हे तर षडयंत्र

हे माझ्या विरोधातील षडयंत्र आहे. तो आवाज माझा नाही. माझ्या विरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचे डॉ. मुकेश मुदगल यांनी सांगितले. मुदगल यांच्या विरोधात यापूर्वीही उमरेड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. ते भाजपचे जिल्हा मंत्री असल्याने पक्षस्तरावर कोणती कारवाई होते, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया