शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

नियंत्रण कक्षाचे तीन तेरा

By admin | Updated: June 17, 2014 00:58 IST

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील

आपत्ती निवारण : अग्निशमन विभागाचा दावा फोलराजीव सिंह - नागपूरपावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. परंतु या कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नाही. सिव्हिल लाईन येथील अग्निशमन विभागाच्या अपत्ती निवारण कक्षापुढे एक टेबल व खूर्ची ठेवून यालाच नियंत्रण कक्षाचे स्वरूप देण्यात आले आहे. ऐवजदार हा कक्ष चालवित असून नियंत्रण कक्षाचा कुठेही ठावठिकाणा नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मदतीचा कॉल आल्यास डयुटीवरील ऐवजदार याची सूचना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देतो. त्यानुसार अग्निशमन विभाग आपत्ती निवारणाची कार्यवाही करतो. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाच्या कार्यालयापुढे फायर टेंडर, बुलेट उभी ठेवली जाते. येथे पंप, बोट व लाईफ जॅकेटही ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अग्निशमन विभागाच्या कक्षात पाणी शिरले होते. परंतु अद्याप यावर उपाययोजना केली नसल्याचे चित्र आहे. अग्निशमन विभागाकडे गोडावून नसल्याने उपकरणे व वाहने उघड्यावर ठेवावी लागतात. व्यवस्था व्हावी यासाठी झोन स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देश आयुक्त श्याम वर्धने यांनी गेल्या वर्षी दिले होते. १ जूनपासून असे कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. असलेला कक्ष हिरावला-गत काळात नियंत्रण कक्षासाठी मनपा मुख्यालयाच्या गेटच्या बाजूला असलेला कक्ष देण्यात आला होता. येथे अग्निशमन विभागाचे कर्मचारी बसत होते. परंतु नंतर राजकीय हस्तक्षेपातून हा कक्ष हिरावून ठेकेदारांना देण्यात आला. याचा गैरवापर केला जात होता. तत्कालीन महापौर विकास ठाकरे यांनी धाड घातली असता कर्मचारी पत्ते खेळताना आढळले होते. त्यामुळे त्यांनी हा कक्ष अग्निशमन विभागाला२ दिला होता. तात्पुरती व्यवस्था-स्वतंत्र जागा नसल्याने नियंत्रण कक्षाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निशमन कक्षाच्या बाजूची जागा हॉटमिक्सला दिली आहे. त्यामुळे विभागाकडे दुसरी जागा नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातूनच आपत्ती निवारण कक्षाचे काम सुरू असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.