शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 'रुग्णकल्याण समिती'चा हातभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:42 IST

Nagpur : काही जिल्ह्यात निधी असूनही समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी व रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रुग्णकल्याण समित्या (आरकेएस) निधी असूनही केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अनेक जिल्ह्यांतील चित्र आहे. परंतु, नागपुरात या समितीच्या नियमित बैठका होत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हातभार लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. ही एक जमेची बाजू ठरली आहे.

जिल्ह्यातील सद्यस्थिती काय ?जिल्ह्यातील अनेक ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णकल्याण समित्या आहेत आणि त्यांच्या नियमित बैठका होत आहेत. 

रुग्णकल्याण समिती काय आहे?रुग्णालयांच्या व्यवस्थापनात स्थानिक लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी रुग्णकल्याण समिती (आरकेएस) स्थापन करण्यात आली आहे. या समित्या रुग्णालयांना आत्मनिर्भर बनवून गरजांनुसार निर्णय घेण्यास सक्षम करतात. स्थानिक आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधींचाही यामध्ये समावेश असतो.

राजकीय प्रतिनिधींचा सहभागया समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, जसे की आमदार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य यांचा समावेश असतो. त्यांचा उद्देश आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवणे हा असतो.

समितीचे कार्य काय?समिती रुग्णालयाला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करते. उदा. नवीन वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, रुग्णालयाची दुरुस्ती करणे, स्वच्छतेचे साहित्य खरेदी करणे, रुग्णालयातील अडचणींवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी नियमित बैठका घेणे, रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना तयार करणे, आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे.

समितीमार्फत कुठे कुठे सुधारणा शक्य ?निधीचा योग्य वापर झाल्यास रुग्णालयातील अनेक सोयीसुविधांमध्ये सुधारणा होऊ शकते. उदा. वैद्यकीय उपकरण खरेदी करणे, रुग्णालयांची स्वच्छता आणि देखभाल अधिक चांगली करणे, बसण्यासाठी खुर्चा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रुग्णालयात सुरळीत वीजपुरवठा आणि आवश्यक त्या दुरुस्तीच्या कामांना गती देणे.

"रुग्णकल्याण समिती अंतर्गत प्रत्येक रुग्णालयात कार्यकारी समितीच्या बैठका व नियामक समितीच्या बैठका नियमित होत असतात. नियामक समितीच्या बैठकीत धोरणात्मक व निधीच्या वापरासंदर्भात निर्णय घेतले जात असल्याने रुग्णालयातील समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते."- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर