शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा वित्त अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेणार नाही : कंत्राटदारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 21:04 IST

महापालिकेतील कंत्राटदारांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात काळ्या फिती लावून वित्त अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देकाम बंदचा इशारा

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेतील कंत्राटदार दिवाळीपासून प्रलंबित बिलाची मागणी करीत आहेत. परंतु वित्त विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात काळ्या फिती लावून वित्त अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बिल न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.एका कंत्राटदाराचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना थकीत बिलाची रक्कम देण्यात यावी, अशी वारंवार मागणी करण्यात आली. परंतु वित्त अधिकारी मोना ठाकूर यांनी नकारात्मक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे एका मंत्र्यांशी जवळीक असलेल्या कंत्राटदाराला तीन दिवसात कोट्यवधीचे बिल देण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांशी जवळीक असलेल्या कंत्राटदारांनाही बिल मिळत आहे. परंतु नियमित काम करणाऱ्यांना आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सागून बिल देण्यास टाळाटाळ केली जात आहे.एलबीटी व जीएसटीच्या वेळी महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही तत्कालीन वित्त अधिकारी कंत्राटदारांना बिल देत होते. परंतु सध्या नवीन फाईल मंजुरी व बिल देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कंत्राटदार हे महापालिकेचाच एक भाग आहे. असे असूनही वित्त अधिकाऱ्यांकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप नागपूर म्युनिसिपल कार्पोरेशन कं त्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांनी केला आहे. १०० कोटींची बिले थकीत असल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात प्रकाश पोटपोसे, संजू चौबे, रमजान भाई, मतीन भाई, अजय लालवानी, युवराज मानकर, शरद दुरुगकर, दिलीप राठी, कमलेश चहांदे, नागसेन हिरेखण व अनिल कुंभारे यांच्यासह कंत्राटदारांचा समावेश होता.मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणारवित्त अधिकाऱ्यांमुळे महापालिकेतील कंत्राटदार संकटात सापडले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती विजय नायडू यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका