शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमला सुविधा पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:11 IST

एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांचे मत : सुरक्षा व्यवस्थेकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. लोकमतने बुधवारच्या अंकात ‘एटीएममध्ये प्रवेश धोकादायकच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या संदर्भात अनेक ग्राहकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या आहेत. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी एटीएममध्ये सॅनिटायझर आवश्यक असल्याचे ग्राहकांनी सांगितले.सदर प्रतिनिधीने राष्ट्रीयीकृत बँकांच्या विविध एटीएमची पाहणी करून सत्यस्थिती वाचकांसमोर मांडली होती. सर्वच एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड आणि आतमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती. अनेक ग्राहकांनी स्वत:जवळील सॅनिटायझरने बटन स्वच्छ केल्या आणि हातावर लावले. सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे, पण याबाबत ग्राहक स्वत:च सजग दिसले. दारावर सुरक्षा गार्ड नसल्याने ग्राहक रांगेत न येता एकाचवेळी अनेकजण आत जाताना दिसले. एका एटीएममध्ये एक महिला दोन लहान मुलींसोबत आत गेली. या दोन्ही मुलींनी मास्क लावले नव्हते. ग्राहकांनी मास्क घातले वा नाही, याची तपासणी करण्यासाठी दारावर सुरक्षा गार्ड असणे आवश्यक असल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्त केले. एटीएमची जबाबदारी कुणाकडे आहे, याची आम्हाला माहिती नाही, पण बँकांनी ग्राहकांना सुरक्षा प्रदान करावी, अशीही प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.कंत्राटदारांना अटी-नियम बंधनकारकबँकांच्या एटीएम सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी कंत्राटदार कंपनीकडे आहे. कंत्राटदारांना अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याची पाहणी बँकांतर्फे करण्यात येते. सॅनिटायझर आहे वा नाही, याची पाहणी करू. मुख्यालयातील एटीएमची व्यवस्था बँकेकडे आहे. त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड आणि सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. ग्राहकांचे तापमान मोजण्यात येत आहे.विलास पराते, क्षेत्रीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.सर्व एटीएमची पाहणी करणारलोकमतच्या वृत्ताची दखल घेतली असून सर्वच एटीएमची पाहणी करणार आहे. सुरक्षा गार्ड व सॅनिटायझर ठेवणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. पाहणीनंतर त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करू. कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. बँका व्यवस्था करतेच, पण ग्राहकांनी बटन सॅनिटाईज्ड करणे आवश्यक आहे. एटीएममध्ये सुरक्षा गार्डची नव्याने भरती करण्यात येणार आहे.मनोज करे, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.

टॅग्स :atmएटीएमnagpurनागपूर