शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळ उपाध्यक्षांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:42 IST

एका कर्मचाऱ्याला तीन महिन्यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक फायदे अदा करण्याच्या ग्वाहीचे पालन केले नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देहायकोर्ट : ग्वाहीचे पालन केले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका कर्मचाऱ्याला तीन महिन्यामध्ये सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक फायदे अदा करण्याच्या ग्वाहीचे पालन केले नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अवमानना नोटीस बजावली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने महामंडळाचे कर्मचारी योगिराज टेकाडे यांच्या बडतर्फीचा आदेश रद्द करून त्यांना सेवेत परत घेण्याचा आदेश दिला होता. तसेच, त्यांची सेवा सलग ग्राह्य धरण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांना सेवेत परत घेऊन त्याच महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. दरम्यान, मार्च-२०१८ मध्ये महामंडळाने टेकाडे यांना सेवानिवृत्तीनंतरचे सर्व आर्थिक फायदे तीन महिन्यात अदा करण्याची ग्वाही उच्च न्यायालयाला दिली होती. ती ग्वाही पाळण्यात आली नाही. परिणामी, टेकाडे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वरील अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावली यावर १९ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, यादरम्यान, टेकाडे यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याची महामंडळाला मुभा दिली. टेकाडे यांच्यातर्फे अ‍ॅड. संजय नेरकर व अ‍ॅड. वीणा मुल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयstate transportराज्य परीवहन महामंडळ