शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

एमसीआय अध्यक्षांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:22 PM

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा कमी करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करणे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)च्या अंगलट आले आहे. या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एमसीआय अध्यक्षांना अवमानना नोटीस बजावून यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्दे‘एमबीबीएस’ जागांचे प्रकरण : हायकोर्टाने मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा कमी करण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करणे मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया (एमसीआय)च्या अंगलट आले आहे. या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एमसीआय अध्यक्षांना अवमानना नोटीस बजावून यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या प्रश्नांसंदर्भात उच्च न्यायालयात वर्ष २००० पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मेयो व अकोला वैद्यकीय महाविद्यालयाला न्यायालयाच्या आदेशामुळे एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमता वाढून १५० झाली. त्यावेळी राज्य सरकारने दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांतील त्रुटी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिला होता. त्यानुसार विविध विकासकामे केली जात आहेत. असे असताना ‘एमसीआय’ने विविध त्रुटींवर बोट ठेवून दोन्ही महाविद्यालयांना वाढीव ५० जागांचे नूतनीकरण देण्यात येऊ नये अशी शिफारस केंद्र सरकारला केली आहे. त्यावरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी ‘एमसीआय’ची कान उघाडणी केली व अध्यक्षांना अवमानना नोटीस बजावली. या प्रकरणात अ‍ॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र असून एमसीआयतर्फे अ‍ॅड. राहुल भांगडे यांनी बाजू मांडली.यापुढे जागा कमी करण्यास मनाईयापुढे ‘एमसीआय’ने उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय विदर्भातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा कमी करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करू नये. तसेच, ‘एमसीआय’ने अशी नकारात्मक शिफारस केल्यास केंद्र सरकारने उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय ती शिफारस मान्य करू नये असा अंतरिम आदेशही न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी दिला आहे. त्यामुळे विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या जागा सुरक्षित झाल्या आहेत.‘एमसीआय’वर ओढले ताशेरे* एमसीआय केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसाठी नियम पाहते. खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांबाबत त्यांची भूमिका उदार असते.* ‘एमसीआय’ने विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विरोधात जाण्याचे अनेक प्रयत्न केले, पण उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे त्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.* ‘एमसीआय’ची कृती केवळ उच्च न्यायालय नाही तर, सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान करणारी आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर