शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

झोननिहाय तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:34 IST

जनतेच्या अडचणी व तक्रारींची दखल घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरातील झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. झोननिहाय आयोजित जनता दरबारात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित विभागाकडून तक्रारी सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांनी तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी दिल्यात.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा जनता दरबार : विभागनिहाय नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनतेच्या अडचणी व तक्रारींची दखल घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरातील झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. झोननिहाय आयोजित जनता दरबारात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित विभागाकडून तक्रारी सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांनी तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिकेच्या झोननिहाय जनता दरबार कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. याप्रसंगी विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महानगरपालिकेचे अपर आयुक्त राम जोशी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे ३ डिसेंबरपासून महानगरपालिकेच्या झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. पहिला जनता दरबार मंगळवारी झोन क्रमांक १० येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी झोनमध्ये नागरिकांना भेटून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी जनतेच्या तक्रारीसंदर्भात मंगळवारी झोन येथे तक्रार स्वीकारण्यासाठी झोन कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करून विभागनिहाय तक्रारी पाच दिवस आधी स्वीकारण्यात याव्यात व प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात संबंधित विभागाकडून या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल मागविण्यात यावा. म्हणजेच जनता दरबारात प्रश्नांची सोडवणूक सुलभपणे होईल. यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झोननिहाय जनतेला भेटून त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. तसेच त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविणार असल्यामुळे जनता दरबाराविषयीची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित झोन अधिकाऱ्याने या उपक्रमाचे नियोजन करावे. तसेच ज्या विभागाशी संबंधित तक्रार अथवा प्रश्न प्राप्त होईल त्या सर्व तक्रारींची एकत्र नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याची राहील. सुटीच्या दिवशी सुद्धा तक्रारी स्वीकारण्यात येतील व या संदर्भात सर्व जनतेला कळविण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर