शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ग्राहक मंच : माही लॅन्ड डेव्हलपर्सला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:23 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून माही लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड बिल्डर्सला दणका दिला.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याच्या हिताचे विविध आदेश जारी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून माही लॅन्ड डेव्हलपर्स अ‍ॅन्ड बिल्डर्सला दणका दिला.नितीन तागडे असे ग्राहकाचे नाव असून ते न्यू सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी आहेत. तागडे यांच्याकडून उर्वरित ३ लाख ९५ हजार रुपये स्वीकारून त्यांना भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्यावे व भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा देण्यात यावा, यात तांत्रिक किंवा कायदेशीर अडचण असल्यास तागडे यांना त्यांचे १ लाख ८१ हजार रुपये १४ टक्के व्याजाने परत करण्यात यावेत, व्याज १६ डिसेंबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत देण्यात यावे असे आदेश मंचने डेव्हलपरला दिले. तसेच, तागडे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये भरपाई मंजूर केली. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याचा वेळ देण्यात आला. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला.तक्रारीतील माहितीनुसार, तागडे यांनी माही डेव्हलपर्सच्या मौजा घोरपड, ता. कामठी येथील ले-आऊटमधील एक भूखंड ५ लाख ७६ हजार रुपयात खरेदी करण्याचा करार केला. दरम्यान, तागडे यांनी डेव्हलपरला १ लाख ८१ हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम १३ ऑगस्ट २०१५ पर्यंत द्यायचे होते त्यानुसार, तागडे यांनी उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवून भूखंडाचे विक्रीपत्र करून मागितले. परंतु, डेव्हलपरने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तागडे यांनी डेव्हलपरला कायदेशीर नोटीस बजावली. ती नोटीस तामील झाली नाही. शेवटी तागडे यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. त्यावर मंचने डेव्हलपरला नोटीस बजावली, पण ते मंचसमक्ष हजर झाले नाही. परिणामी, मंचने तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही केली व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.दोषपूर्ण सेवा दिलीतागडे उर्वरित रक्कम देण्यास तयार असतानाही डेव्हलपरने भूखंडाचे विक्रीपत्र करून दिले नाही व तागडे यांच्याकडून घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यावरून डेव्हलपरने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे व तागडे यांना दोषपूर्ण सेवा दिली असल्याचे स्पष्ट होते असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे