शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंच : आदेशांची अवमानना, दोघांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:00 IST

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मूळ तक्रारीतील प्रतिवादी प्रशांत मेश्राम व भीमराव मेश्राम यांना आदेशांची अवमानना केल्यामुळे प्रत्येकी दोन वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड , अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देवृद्ध महिलेला १० हजार रुपये दंड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मूळ तक्रारीतील प्रतिवादी प्रशांत मेश्राम व भीमराव मेश्राम यांना आदेशांची अवमानना केल्यामुळे प्रत्येकी दोन वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. तृतीय प्रतिवादी ताराबाई मेश्राम या वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना केवळ १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच, ही रक्कम जमा न केल्यास एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल असे स्पष्ट करण्यात आले.मूळ तक्रारकर्तीच्या कायदेशीर वारसदार देवकीबाई निनावे यांनी या तिघांविरुद्ध अर्ज दाखल केला होता. त्यावर मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी निर्णय दिला. मूळ तक्रारीनुसार, तक्रारकर्तीने १० फेब्रुवारी १९९३ रोजी प्रशांत मेश्राम यांच्याकडून १६२० चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला होता. तक्रारकर्तीला भूखंडाचा कागदोपत्री ताबा देण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे मंचने २४ नोव्हेंबर २०११ रोजी तक्रार अंशत: मंजूर केली होती आणि तक्रारकर्तीला भूखंडाचा प्रत्यक्ष ताबा देण्यात यावा व ते शक्य नसल्यास १ जानेवारी २०१० रोजीच्या बाजारभावानुसार किंमत अदा करण्यात यावी असे आदेश तिन्ही प्रतिवादींना दिले होते. तसेच, तक्रारकर्तीला एकूण चार हजार रुपये भरपाईसाठी पात्र ठरवले होते. प्रतिवादींना आदेशांचे पालन करण्यासाठी तीन महिन्याचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्यांनी त्या आदेशांचे पालन केले नाही. परिणामी त्यांना दणका बसला.निर्णयातील निरीक्षणप्रतिवादी कोणत्याना कोणत्या कारणावरून आणि तेचते मुद्दे पुन्हा-पुन्हा उपस्थित करून मंचच्या आदेशांचे पालन करण्यास टाळाटाळ करीत आहे. आदेशांचे पालन न करण्याची त्याची कृती जाणून-बुजून केली असल्याचे निष्पन्न होते. मंचाने दिलेले आदेश तिघांनाही बंधनकारक होते. त्या आदेशांचे पालन तिघांनी संयुक्तिक किंवा वैयक्तिकरीत्या करायचे होते. परंतु, आजपर्यंत त्यांनी आदेशांचे पालन केले नसल्याने आदेशांची अवहेलना झाली. त्यामुळे तिघेही शिक्षेस पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे