शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ग्राहक मंचचा आदेश : ग्राहकाचे २.७२ लाख २४ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:25 IST

ग्राहकाचे २ लाख ७२ हजार ९३६ रुपये २४ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मॉ वैदेही बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. भरपाईची रक्कम बिल्डरनेच द्यायची आहे.

ठळक मुद्देमॉ वैदेही बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहकाचे २ लाख ७२ हजार ९३६ रुपये २४ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मॉ वैदेही बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाई मंजूर केली. भरपाईची रक्कम बिल्डरनेच द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. विनय गुप्ता असे ग्राहकाचे नाव असून ते महाल येथील रहिवासी आहेत. २ लाख ७२ हजार ९३६ रुपयांवर १४ फेब्रुवारी २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या निर्णयाचे पालन करण्यासाठी बिल्डरला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे.निर्णयातील माहितीनुसार, गुप्ता यांनी मॉ वैदेही बिल्डरच्या मौजा सेलू, ता. कळमेश्वर येथील सेलू नगरी गृह योजनेतील दोन सदनिका ४ लाख ५४ हजार ३०० रुपयात खरेदी केल्या होत्या. त्यासंदर्भात १० ऑक्टोबर २०११ रोजी करार झाला होता. बिल्डरने २०१३ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. गुप्ता यांनी १७ जून २०१२ पर्यंत बिल्डरला ३ लाख ९२ हजार ९३६ रुपये अदा केले. दरम्यान, गुप्ता यांनी सदनिकांचे विक्रीपत्र करून मागितले असता, बिल्डरने त्याकरिता असमर्थता दर्शवली. तसेच, त्यानंतर झालेल्या तडजोड करारानुसार बिल्डरने गुप्ता यांना त्यांची रक्कम परत केली नाही. त्यामुळे गुप्ता यांनी कायदेशीर नोटीस बजावली. परिणामी, बिल्डरने केवळ १ लाख २० हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम दिली नाही. शेवटी, गुप्ता यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने ती तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.काय म्हणाले मंचबिल्डरने अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे गुप्ता यांच्या सदनिका घेण्याच्या मूळ उद्देशाला तडा गेला. त्यांचे आर्थिक नुकसानही झाले. ३ लाख ९२ हजार ९३६ रुपये अदा करूनदेखील त्यांना सदनिकांच्या वैधानिक हक्कापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यासाठी ते माफक भरपाई मिळण्यास पात्र आहेत असे मंचने निर्णयात म्हटले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे