शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ग्राहक मंचचा आदेश : तक्रारकर्त्याला १३ लाख रुपये अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:13 IST

तक्रारकर्त्याला विविध कारणांसाठी एकूण १३ लाख रुपये अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सदरमधील शांतीमोहन हॉस्पिटल, हॉस्पिटलमधील चिकित्सक डॉ. संजय जैन, डॉ. वाय. आर. जैन व डॉ. वाय. बालसुब्रमण्यम यांना दिला आहे.

ठळक मुद्देसदरमधील शांतीमोहन हॉस्पिटलला दणका

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : तक्रारकर्त्याला विविध कारणांसाठी एकूण १३ लाख रुपये अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सदरमधील शांतीमोहन हॉस्पिटल, हॉस्पिटलमधील चिकित्सक डॉ. संजय जैन, डॉ. वाय. आर. जैन व डॉ. वाय. बालसुब्रमण्यम यांना दिला आहे.सुरेश मिश्रा असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते दोसर चौक येथील रहिवासी आहेत. १३ लाख रुपयांमध्ये उपचार खर्चाचे २ लाख ७० हजार रुपये, नुकसान भरपाईचे १० लाख रुपये व तक्रार खर्चाचे ३० हजार रुपयांचा समावेश आहे. तसेच, उपचार खर्च रकमेवर ५ जून २००८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १० टक्के व्याज लागू करण्यात आले आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी नुकताच हा निर्णय दिला.तक्रारीतील माहितीनुसार, मिश्रा यांची मुलगी पायल हिला पोट दुखण्याचा व इतर त्रास होता. त्यामुळे तिला ९ जून २००७ रोजी शांतीमोहन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. डॉक्टरांनी क्षयरोगाचे उपचार सुरू केले, पण पायलच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर आवश्यक चाचण्या केल्या असता पायलला क्षयरोग नसल्याचे आढळून आले. तेव्हापर्यंत पायलची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यामुळे तिला १४ जून रोजी केयर हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. त्या ठिकाणी तिला कार्डियाक एनसेफेलॉपॅथी आजार असल्याचे निदान करण्यात आले. परंतु, ती वाचू शकली नाही. शांतीमोहन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी चुकीचे रोगनिदान व उपचार केल्यामुळे पायलचा मृत्यू झाला. उपचारावर लाखो रुपये खर्च करूनही काहीच फायदा झाला नाही असा तक्रारकर्त्याचा आरोप होता. पायल बिरला सन लाईफ इन्शुरन्समध्ये वार्षिक २ लाख १० हजार ९६० रुपये पॅकेजवर काम करीत होती.अकरा वर्षानंतर आला निर्णयमिश्रा यांनी यासंदर्भात जून-२००८ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर ११ वर्षानंतर निर्णय देण्यात आला. मंचने नोटीस बजावल्यानंतर हॉस्पिटल व संबंधित चिकित्सकांनी सविस्तर लेखी उत्तर दाखल करून तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले होते व तक्रार खारीज करण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मंचने मिश्रा यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचhospitalहॉस्पिटल