शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंच : नवी दिल्लीतील जीडीएस हॉटेलला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:51 IST

नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.

ठळक मुद्दे११ ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.ग्राहकांचे ४२ हजार ६०४ रुपये १३ टक्के व्याजाने परत करण्यात यावे असा आदेश मंचने हॉटेलला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही हॉटेलने द्यायची आहे. ४२ हजार ६०४ रुपयांवर २९ नोव्हेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी हॉटेलला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला.ग्राहकांमध्ये नागपूर येथील डॉ. राहुल देशमुख व इतर १० व्यक्तींचा समावेश आहे. त्यांनी २०१६ मधील ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मध्य प्रदेशातील पेंचमधील किप्लिंग कोर्ट रिसोर्ट येथे जाण्याचे ठरवले होते. त्यांतर्गत त्यांनी जीडीएस हॉटेलमधील तीन वातानुकुलित खोल्या आरक्षित केल्या होत्या. त्याकरिता २९ नोव्हेंबर २०१६ रोजी ४२ हजार ६०४ रुपये हॉटेलच्या खात्यात जमा केले होते. परंतु, २८ डिसेंबर २०१६ रोजी हॉटेलने त्यांना आरक्षण रद्द झाल्याचे कळवले. त्यानंतर ग्राहकांनी हॉटेलला दिलेली रक्कम परत मागितली. परंतु, वारंवार संपर्क व पाठपुरावा करूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही. परिणामी, ग्राहकांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. आरक्षणाकरिता दिलेले ४२ हजार ६०४ रुपये व अन्य हॉटेलमध्ये राहण्यासाठी झालेला ६१ हजार ८७६ रुपयाचा खर्च १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावा आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंचला केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.निर्णयातील निरीक्षणग्राहकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी हॉटेलकडे सलग पाठपुरावा केला. परंतु, हॉटेलने त्यांना दाद दिली नाही. त्यावरून हॉटेलने ग्राहकांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. परिणामी, ग्राहक त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी व शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचhotelहॉटेल