शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

त्या  भूखंड विक्रेत्यांना ग्राहक आयोगाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 22:18 IST

Plot sellers slaps Consumer Commission भूखंड विक्रेते शालिनी चंद्रिकापुरे व प्रफुल्ल चंद्रिकापुरे यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये एका प्रकरणात जोरदार चपराक बसली. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाचे हित जपण्यासाठी त्यांना विविध निर्देश दिले.

ठळक मुद्देग्राहकाचे हित जपण्यासाठी विविध निर्देश दिले

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : भूखंड विक्रेते शालिनी चंद्रिकापुरे व प्रफुल्ल चंद्रिकापुरे यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये एका प्रकरणात जोरदार चपराक बसली. आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाचे हित जपण्यासाठी त्यांना विविध निर्देश दिले.

बुद्धा बोरकर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते घोगली, ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. त्यांना त्यांचे ९ लाख रुपये व त्यावर ६ एप्रिल २०१६ पासून १८ टक्के व्याज किंवा संबंधित भूखंडाची वर्तमान रेडी रेकनरनुसार किंमत यापैकी जी रक्कम जास्त होईल ती अदा करण्यात यावी. तसेच, त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ७५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई द्यावी, असे निर्देश आयोगाने भूखंड विक्रेत्यांना दिले. या निर्देशांचे एक महिन्यात पालन करण्यात अपयश आल्यास त्यापुढे रोज १०० रुपये नुकसानभरपाई लागू होईल, असेही आयोगाने सांगितले. आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला.

तक्रारीतील माहितीनुसार, बोरकर यांनी शालिनी चंद्रिकापुरे व प्रफुल्ल चंद्रिकापुरे यांच्याकडून मौजा कळमेश्‍वर येथील ले-आऊटमधील एक भूखंड ९ लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी २५ फेब्रुवारी २०१५ रोजी करार केला. त्यानंतर विक्रेत्यांना संपूर्ण रक्‍कम अदा केली. परंतु, विक्रेत्यांनी त्यांना भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून दिले नाही. त्यांनी बजावलेल्या कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही. परिणामी, बोरकर यांनी आयोगात धाव घेतली होती. विक्रेत्यांनी बोरकर यांच्या तक्रारीवर लेखी उत्तर सादर करून स्वत:विरुद्धचे सर्व आरोप फेटाळले. तसेच, विविध मुद्द्यांच्या आधारावर तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.

विक्रेत्यांचे आक्षेप फेटाळले

बोरकर यांनी संपूर्ण रक्कम अदा करूनही विक्रेत्यांनी त्यांना अद्याप भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. सर्व वस्तुस्थितीचा विचार करता विक्रेत्यांची ही कृती सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दर्शविते. त्यामुळे त्यांनी तक्रारीवर नोंदवलेले सर्व आक्षेप फेटाळण्यात येतात, असे आयोगाने निर्णयात म्हटले.

टॅग्स :consumerग्राहक