शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेट्रो प्लाझा व मेडिकल हब उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:23 IST

मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मेडिकल हब व जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो प्लाझा उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी समितीच्या बैठकीनंतर दिली.

ठळक मुद्देआॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प : सात भागात प्रकल्पाचे विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आॅरेंज सिटी प्रकल्पाचे काम आता महापालिका स्वत: करणार आहे. यासाठी वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते सीआरपीएफपर्यंतची ३०.४९ हेक्टर जमीन सात विभागात २१ प्लॉटमध्ये विभाजित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १० लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मेडिकल हब व जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो प्लाझा उभारण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी समितीच्या बैठकीनंतर दिली.आॅरेंज सिटी स्ट्रीट हा महापालिका व भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. माझ्या कार्यकाळात या प्रकल्पाला सुरुवात क रण्याचा मानस आहे. ट्रान्झेक्शन अ‍ॅडवायझरसाठी निविदा काढण्यात आली आहे. पहिल्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदा मे. वेस्टिन ग्लोबल वर्क प्लेस सर्व्हिसेस प्रा. लि. अ‍ॅन्ड वेंकटेश्वरा हॅबीटेट एलएलपी कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी बंगळुरू, पुणे यासह अन्य शहरात चांगले काम केले आहे. आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु एकमेव हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांना २५ लाखांचे बिल देण्यात आले आहे. त्याशिवाय दुसरा कोणत्याही स्वरूपाचा खर्च करण्यात आलेला नाही. आॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प एकाच वेळी राबविण्याचा विचार होता. यासाठी वर्षभरापूर्वी प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली.प्रकल्पाचे काम सुरू व्हावे, यासाठी दर आठवड्याला बैठक होत आहे. मेडिकल हबच्या धर्तीवर आॅरेंज सिटी स्ट्रीटचा सर्वप्रथम विकास केला जाईल. काही डॉक्टरांनी येथे रुग्णालय सुरू करण्याला सहमती दर्शविली आहे. यातून मिळणाºया उत्पन्नातून प्रकल्पाचा पुढील खर्च करण्याचा विचार आहे.अवैध रस्ते बंद करणारआॅरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातून १४ रस्ते जातात. येथे अवैध रस्ते निर्माण करण्यात आलेले आहेत. परवानगी नसलेले रस्ते बंद करण्यात येतील. आराखड्यातील प्रस्तावित रस्तेच कायम राहतील, अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.गणेश विसर्जनासाठी ११२ कृत्रिम टँकगणेश विसर्जनसाठी महापालिका यावर्षी ११२ कृ त्रिम टँक उभारणार आहेत. १२ फूट बाय ३० इंच आकाराचे ५३ कृत्रिम टँक व १५ फूट बाय ३६ इंच आकाराचे ५९ कृत्रिम टँक झोन स्तरावर उपलब्ध करण्यात येतील. तर तीन टँकची अतिरिक्त व्यवस्था विभागाकडून केली जाणार आहे. जुने टँक वापरण्याजोगे असल्यास त्याचा वापर केला जाईल. मागणीनुसार पुरवठा केला जाईल. जिल्हा नियोजन समितीकडे यासाठी ६० लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार व खासदार निधीतून यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या निविदा काढण्याला व दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर