शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भांडेवाडीत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांची निर्मिती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:59 IST

कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांची घोषणा : विविध प्रकल्पांचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपुर : कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सेवेकरिता सामंजस्य करार, भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पासह अन्य संबंधित प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी केंद्रीय रेल्वे, कोळसा व वित्त मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनमुळे प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वोत्तम कोळशामुळे १३५० कोटींची बचतफडणवीस म्हणाले, वेकोलिच्या कोळशाचा दर्जा सुधारल्यामुळे महाजेनकोला वर्षभरात १३५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन विजेचे दर कमी झाले आहेत. कन्वेअर बेल्टने पाच खाणींतून कोळसा थेट वीज प्रकल्पांना मिळणार असल्याने वाहतूक खर्च आणि प्रदूषण कमी होईल. वेस्ट वॉटर धोरणांतर्गत वीज प्रकल्प आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेले पाणी मिळेल.मेट्रोमुळे नागपूर-वर्धा प्रवास ३५ मिनिटात : गडकरीनितीन गडकरी म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस शुरू झाल्यानंतर कमी भाड्यात नागपूर-रामटेक प्रवास केवळ २० मिनिटात आणि नागपूर-वर्धा प्रवास केवळ ३५ मिनिटांत करता येईल. या प्रवासात कन्हान, डुमरी आदी भागातील टाऊनशिप आणि वर्धा, काटोल आदी शहरे सॅटेलाईट शहरे बनतील. आता नागपूरच्या धर्तीवर भोपाळ-बैतुल, भोपाळ-इंदूर, जयपूर-दिल्ली येथे ब्रॉडगेज मेट्रो फीडर सेवा सुरू व्हावी. गडकरी म्हणाले, वेकोलिच्या विविध खाणी आणि महाजेनकोतून निघणारे पाणी शेतकऱ्यांना नि:शुल्क मिळेल. यामुळे विदर्भात १० हजार एकर शेती सिंचनाखाली येईल. यामुळे १० एमएलडी पाणी कोराडी, खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना मिळणार आहे. पाच खाणीतून पाईप कल्वेअरच्या मदतीने कोराडी आणि खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना मिळणाऱ्या कोळशाचा वाहतूक खर्च आणि प्रदूषण कमी होण्यासह वीज निर्मितीचा खर्च कमी येईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMetroमेट्रो