शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

वर्धा जिल्ह्यातील सिंदीत ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोचेसची होणार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 11:20 IST

मेट्रो नागपुरातून ब्रॉण्डगेजवर धावणार आहे. ब्रॉडगेजसाठी लागणाऱ्या कोचेसची (रोलिंग स्टॉक) निर्मिती वर्धेतील सिंदी येथे होणार आहे.

ठळक मुद्दे७ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन रेल्वेच्या ब्रॉडगेजवर धावणार मेट्रो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो नागपुरातून ब्रॉण्डगेजवर धावणार आहे. ब्रॉडगेजसाठी लागणाऱ्या कोचेसची (रोलिंग स्टॉक) निर्मिती वर्धेतील सिंदी येथे होणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.रविवारी हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात लोकमतच्या पॉलिटिकल आॅयकॉनचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या ‘रोलिंग स्टॉक’च्या उत्पादन प्रकल्पाची स्थापना होणार आहे. गोंदियापासून ते वर्धेपर्यंत, रामटेक ते वर्धा, नरखेड ते वर्धा या मार्गावर ब्रॉडगेजवर मेट्रो चालविण्याचा माझा संकल्प अधिकाऱ्यांसमोर बोलून दाखविला तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यात रेल्वेचेही अधिकारी होते. पण मी माझ्या संकल्पावर ठाम होतो. पाठलाग केला. आता हा प्रकल्प सुरू होणार आहे. पायाभूत सुविधा रेल्वेच्या राहणार आहे. त्यामुळे रेल्वेचे नुकसान भरुन निघेल. ‘मेट्रो’चा प्रति किलोमीटर बांधकाम खर्च ३५० कोटी आहे तर ‘ब्रॉडगेज मेट्रो’चा हाच खर्च साडेतीन कोटी इतका आहे. पॅसेंजरचा वेग प्रति तास ४० कि़मी., एक्स्पे्रसची गती १६० कि़मी. आणि मेट्रोची गती प्रति तास १२० कि़मी. आहे. त्यामुळे पॅसेंजर धावणे बंद होईल. पुढे मेट्रो बडनेरापर्यंतही नेता येईल. त्यामुळे सुलभ आणि जलद सेवा मिळणार आहे.हा प्रकल्प ५० एकरात तीन टप्प्यात जवळपास ९०० कोटींच्या गुंतवणुकीतून पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात २८० कोटींची गुंतवणूक होणार आहे. या टप्प्यात महामेट्रो गुंतवणूक करणार आहे.महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला नागपुरात येणार आहेत. कार्यक्रम कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. या दरम्यान ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोच निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो