शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हिंगणा टी-पॉईंटवरील आंगन गजालीचे बांधकाम तोडले, दंडही ठोठावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 20:56 IST

गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला.

ठळक मुद्देनागपुरातील २२ रुफ टॉप रेस्टॉरंट रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात विनापरवानगीने सुरू असलेल्या सर्व रुफ टॉप रेस्टॉरंटवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अग्निशमन विभागाने अशा २२ रुफ टॉप रेस्टॉरंटची यादी तयार केली असून या सर्व रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत असलेल्या हिंगणा टी-पॉईंट टाकळी सीम येथील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रुफ टॉप रेस्टॉरंट गेल्या काही वर्षांपासून सुरू होते. आंगन गजाली असे त्या रेस्टॉरंटचे नाव असून प्रसन्न दारव्हेकर हे त्याचे संचालक आहेत. हे रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी अग्निशमन विभागाची परवानगी घेण्यात आली नाही शिवाय बांधकामासाठीही मंजुरी घेण्यात आली नाही. तेथे लाकडी तट्टे, लाकडी पार्टीशन, बांबू व किचनमध्ये एलपीजी गॅस अशा ज्वलनशील वस्तूंचा वापर होत असल्याचे मनपा अग्निशमन विभागाच्या लक्षात आले. यासाठी २४ नोव्हेंबर २०१६ आणि ३१ मार्च २०१८ ला नोटीस देण्यात आली होती. मात्र या नोटीसकडे दुर्लक्ष करीत संचालकांनी रेस्टॉरंट सुरूच ठेवले. अखेर आयुक्त मुंढे यांच्या निर्देशानुसार लक्ष्मीनगर झोन आणि अग्निशमन विभागाच्यावतीने कारवाई करीत अवैध असलेले संपूर्ण बांधकाम तोडण्यात आले. याव्यतिरिक्त १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.असा झाला लोकमत इम्पॅक्टजानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकमतने शहरात सर्रासपणे चालत असलेल्या रुफ टॉप रेस्टॉरंटवर वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर मनपा प्रशासनाकडून संबंधित रेस्टॉरंटची तपासणी करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक सक्रिय झाले. फायर स्टेशनच्या सेंटरनुसार छतांवर संचालित रेस्टॉरंटची माहिती मागवण्यात आली. काही रेस्टॉरंटवर खानापूर्तीसाठी कारवाई झाली. त्यानंतर विधान परिषदेमध्ये नागो गाणारने लोकमतच्या वृत्ताचा उल्लेख करीत २५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रश्न उपस्थित केला. यावर सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या उत्तरासाठी राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून सविस्तर माहिती मागितली. त्यानंतर अग्निशमन विभाग व नगररचना विभागात खळबळ उडाली. आयुक्त मुंढे यांनी विभाग प्रमुखांना जाब विचारला. २७ फेब्रुवारी रोजी मनपाकडून उत्तर सादर करण्यात आले. यानंतर राज्य शासनाचे सतीश मोघे यांनी मनपा आयुक्तांना ६ मार्च २०२० रोजी पत्र जारी करीत रुफ टॉप रेस्टॉरंटच्या बांधकामाला प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत तपासणी आवश्यक असून तपासणीनंतर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपा आयुक्त मुंढे यांनी नगररचना विभाग व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि यात कारवाई करण्याचे निर्देश दिले. शेवटी रुफटॉप रेस्टॉरंटच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली.२२ रूफ टॉप रेस्टॉरंट आयुक्तांच्या रडारवरअग्निशमन विभागाने अशा २२ रूफ टॉप रेस्टॉरंटची यादी तयार केली आहे. या सर्व रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ज्या रेस्टॉरंटवर कारवाई होणार आहे, ते पुढीलप्रमाणे आहेत.मे. अमरजीत रिसोर्ट प्रा.लि. हॉटेल सेंटर पॉइंट, प्रो. एस.पी. अरोरा व जसबिरसिंग अरोरा प्लॉट नं. १३१ए/१, मौजा सोमलवाडा, वर्धा रोड.मे. हॉटेल प्राईड युनिक ऑफ जॅगसन हॉटेल पीआए सुरेशचंद्र पी. जैन, एअरपोर्ट समोर, वर्धा रोड.मे. रोसेस्टा एलिट क्लब यशोधाम एनक्लेव्ह, प्रशांतनगर एफ.सी.आय. गोडाऊनच्या बाजूला अजनी.मे. ३९ हाईट रूफ टॉवर मे. कोरल हॉटेल, प्रो. प्रा. अभिषेक खुशावार, प्लॉट नं. १२, १३, १४ मनीषनगर टी पॉइंट, बेसा रोड.मे. सेव्हन सूट रूम अ‍ॅण्ड रेस्टारंट, प्रशांत मुळे, भोगवटदार कु. अल्का दिघोरीकर,अभ्यंकरनगरमे. कोरीएंडर लीफ प्रो. प्रा. सचिन एस. महाजन, पाठक हाऊस, प्लॉट नं. ३३ व ३४, अभ्यंकरनगर.मे. पटियाला हाऊस मे. हॉटेल हर्मीटेज प्रो.प्रा. रायपुरे व सुनील फुलझेले कन्नमवार नगर, वर्धा रोड.मे. मोका स्काय, हॉटेल ट्रॅव्होटेल प्रो. प्रा. राजेश टेंभुर्णे कन्नमवार नगर, वर्धा रोडरूफ ९ रेस्टॉरंट धरमपेठ, कॉफी हाऊस चौक.तुली एम्पेरियल हॉटेल, रामदासपेठ, वेस्ट हायकोर्ट रोड.चील अ‍ॅण्ड ग्रीन रेस्टॉरंट आणि लॉज, शिल्पी अजय बागडी, पहिला माळा, पूनम आॅर्केड, सीताबर्डी.सीजन किचन ओपन रेस्टॉरंट ,माऊंट रोड, सदर.श्री वली, ५०१ ओपन रेस्टॉरंट, ट्राफिक पार्कजवळ, धरमपेठ.कारनेशन ओपन रेस्टॉरंट, माऊंट रोड, सदर.मे. हेवन हायलाईफ रेस्टॉरंट, कार्र्तिक नायडू व इतर विट्स नागपूर कामत हॉटल लि. प्लॉट नं. ७ धंतोली, वर्धा रोड,मे. वऱ्हाडी ठाट,गणेश चेंबर यशवंत स्टेडियमसमोर, धंतोली.हॉटेल श्रवण, रमेश मोहता, झाशी राणी चौक.मॅजिक फूड कोर्ट, जरीपटका रिंग रोड,मे. आंगण गजानी, प्रसन्न दारव्हेकर, हिंगणा टी. पॉइंट, टाकळी सीम.मे. व्हीला प्लॉट नं. १६७, अभ्यंकरनगर.दि. टिंबर ट्रंक, गुड्डू बंसल, काचीमेट अमरावती रोड.दि बिहाईन्ड दि बार, प्लॉट नं. ५, अध्यापक ले-आऊट, हिंगणा रोड.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणhotelहॉटेलNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका