शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महापौर जोशी व तिवारींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:05 PM

महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे‘व्हायरल ऑडिओ क्लिप’मुळे खळबळ : देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीसाठी गृहमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गृहमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे.दोन दिवसांअगोदर काही ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बºयाच लोकांच्या मोबाईलवर ही ‘क्लिप’ गेली. या ‘क्लिप’मध्ये दोन अज्ञात व्यक्ती बोलत असून महापौर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून अडचणीत आणण्यासंदर्भात त्यांचे संभाषण आहे. दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी यात दोघांची चर्चा झाली असून मनपातून निलंबित करण्यात आलेल्या डॉ. गंटावार यांचादेखील यात उल्लेख आहे. दोन्ही नेत्यांना अडचणीत आणताना कुठेही समोर यायचे नाही व पडद्यामागे राहूनच हालचाली करायच्या आहेत, अशीदेखील दोघांमध्ये चर्चा झाली. संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी नेमके कोण कटकारस्थान करत आहे, यांचा करविता धनी कोण, इत्यादी प्रश्न यातून उपस्थित होत आहेत.धंतोलीतील ‘ते’ इस्पितळ कुठलेया ‘क्लिप’मध्ये दोन्ही व्यक्ती एका डॉक्टरबाबतदेखील चर्चा करत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘आपण अगोदर सरांच्या धंतोली येथील इस्पितळात भेटलो होतो. आपण तेथेच बसून पुढील बैठक करू. त्यांचे आता बैद्यनाथ चौकात नवीन इस्पितळ बनत आहे’, असा यात संवाद आहे. ते नेमके कोणत्या डॉक्टरबाबत बोलत आहेत, हादेखील प्रश्न आहे.उच्चस्तरीय चौकशी व्हावीयासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. या ‘क्लिप’मध्ये भाजपच्या नेत्यांविरोधात ‘हनी ट्रॅप’ करून त्यांना अडकविण्याच्या गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख आहे. शिवाय गृहमंत्र्यांचेच नाव घेऊन शहरात गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचे दोन्ही अज्ञात व्यक्ती बोलत आहेत. न्यायव्यवस्थेबाबतदेखील अयोग्य भाषा वापरली आहे. ही बाब गंभीर असून या ‘क्लिप’ची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीhoneytrapहनीट्रॅप