शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हा तर जातीय चौकटीत बंदिस्त करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:32 IST

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : वामन निंबाळकर लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वामन निंबाळकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ‘वाहत्या जखमांचा प्रदेश : आकलन व समीक्षा’ आणि ‘चळवळीचे दिवस’ (अधुरं स्वकथन) या दोन पुस्तकांचे प्रकाशन दीक्षाभूमी येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या कर्मवीर दादासाहेब ऊर्फ ना.ह. कुंभारे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, ललिता सबनीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, स्नेहलता निंबाळकर उपस्थित होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, सध्याची स्थिती बिकट आहे. कर्मठ आंबेडकरी व लिबरल आंबेडकरी असे दोन गट निर्माण झाले आहेत. ते आपापल्या परीने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी करतात. वामन निंबाळकरांची सत्यवादी व औदार्याची आहे. ते संवेदनशील कवी होते. वाहत्या जखमांचा प्रदेश यातून त्यांना केवळ जखमा दाखवायच्या नाहीत तर त्या जखमांवर मलमपट्टी कोण करणार याचे चिंतन आहे. गिरीश गांधी म्हणाले, निंबाळकर यांच्या दलित पँथरच्या प्रवासापासूनचा मी साक्षीदार आहे. विचारवंतांनी समाजात मिसळू नये असे संकेत असताना हा विचारवंत सर्वात मिसळायचा. त्यांच्यासारख्या धडपडणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, वामन निंबाळकर यांनी आपल्या लिखाणातून दलित चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांनी समाजाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. निंबाळकर हे निसर्गाने घडविलेले कार्यकर्ते होते. प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचे कार्य सीमारेषांना ओलांडणारे असून या साहित्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मापदंड निर्माण केला. चळवळीचे दिवस हे स्वकथन एका व्यक्तीच्या प्रगतीचे कथन नसून समाजाच्या भळभळत्या वेदना मांडण्याचे काम यातून झाले आहे. प्रास्ताविक स्नेहलता निंबाळकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार स्नेहलता खंडागळे यांनी मानले.

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसnagpurनागपूर