शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

रेल्वेचा घातपात घडविण्याचे शिजत आहे कटकारस्थान; चार दिवसांत दोन कट उधळले

By नरेश डोंगरे | Updated: October 6, 2023 21:19 IST

शंका-कुशंकांनी रेल्वे प्रशासन हादरले: शेकडो निष्पाप जिवांना संपविण्याचे कुणाचे षडयंत्र?

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात पुन्हा एकदा रेल्वेचा घातपात घडवून शेकडो निष्पाप जिवांशी खेळण्याचे कटकारस्थान शिजत असल्याची शंका उपस्थित झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या शंकेला अधोरेखित करणारे दोन मोठे कट सुदैवाने उधळले गेले. मात्र, या कट कारस्थानाबाबत सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात असल्याने रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेसह सर्वच सुरक्षा यंत्रणा आजपासून सुरक्षेचे 'जॉइंट ऑपरेशन' करण्यासाठी कामी लागल्या आहेत. 

देश-विदेशात चर्चेला आलेला ओडिशातील बालासोरचा भयावह रेल्वे अपघात अजूनही ताजाच आहे. २ जून २०२२ ला झालेल्या या अपघातामागे घातपात असल्याची जोरदार चर्चा त्यावेळी केली जात होती. त्याच्या कटू आठवणी ताज्याच असताना २ ऑक्टोबरला राजस्थानमधील जयपूर जवळ वंदे भारत ट्रेनच्या ट्रॅकवर मोठमोठे दगड रचून घातपात घडविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हादरलेल्या रेल्वे प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे तसेच खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या घटनेला अवघे चार दिवस होत नाही तोच आता महाराष्ट्रातील चिंचवड आकूर्डी दरम्यानच्या रेल्वे लाईनवर असाच प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला. विशेष म्हणजे, अर्धा किलोमिटरच्या अंतरात घातपाताचे षडयंत्र रचणाऱ्या समाजकंटकांनी चार ते पाच ठिकाणी गोठलेल्या सिमेंटच्या बॅगसह जागोजाती दगडाचे थर रचल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येत आहे. 'ट्रॅक पेट्रोलिंग' करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने एक भयावह रेल्वे अपघात टळला आहे.षडयंत्राचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

या घातपाताच्या षडयंत्राचा व्हिडीओ रेल्वेच्या देशभरातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर आल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रेल्वेत घातपात घडविण्याचा कट शिजत असल्याची जोरदार चर्चाही त्यामुळेच सुरू झाली आहे. अशा प्रकारे घातपात घडवून शेकडो निष्पाप जिवांचा बळी घेणारे समाजकंटक कोण, असा संतापजनक प्रश्न उपस्थित झाला असून त्यातून ते काय साध्य करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.समाजकंटक, दहशतवादी की नक्षलवादी

सणासुदीच्या दिवसांत झालेल्या घातपाताच्या या दोन्ही प्रयत्नांमुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. रेल्वेचा अपघात घडवून शेकडो लोकांना मृत्यूच्या जबड्यात पोहचविण्याचे प्रयत्न संबंधित परिसरातील समाजकंटक करीत आहेत की यामागे दहशतवादी किंवा नक्षलवादी आहेत, ते सुद्धा शोधले जात आहे.जीआरपी, आरपीएफ आणि सिटी पोलिसांचे जॉईंट ऑपरेशन

या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून, रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि राज्यभरातील त्या-त्या ठिकाणच्या पोलिसांकडून (सिटी पोलीस) जॉईंट पेट्रोलिंग केली जात आहे. या प्रकारामागे कोण आहेत, त्याचाही कसून शोध घेतला जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी या संबंधाने बोलताना लोकमतला सांगितले. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे