शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"सहमतीच्या शरीरसंबंधाला बलात्कार म्हणू शकत नाही", उच्च न्यायालयाने बॉयफ्रेंडची केली निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 21:44 IST

Nagpur Crime: नितीन ओमप्रकाश अग्रवाल, असे प्रियकराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध नागपूर शहरातील अंबाझरी पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०१३ रोजी बलात्काराच्या गुन्ह्याचा एफआयआर नोंदवला गेला होता.

High Court Verdict On Rape Case: "महिलेने स्वतःच्या सहमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधाला बलात्कार म्हणू शकत नाही," असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात देऊन प्रियकराला आरोपमुक्त करण्याचे निर्देश दिले.

नितीन ओमप्रकाश अग्रवाल, असे प्रियकराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०१३ रोजी बलात्काराच्या गुन्ह्याचा एफआयआर नोंदवला होता व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. परिणामी, अग्रवालने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा गुन्हा अवैध असल्याचा दावा केला आणि आरोपमुक्त करण्याची मागणी केली होती.

तक्रारकर्ती महिला विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती २०११ मध्ये अग्रवालच्या संपर्कात आली.

त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अग्रवालने लग्न करण्याची व दोन मुलांची काळजी घेण्याची ग्वाही देऊन वारंवार बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला होता.

महिला समजदार, परिणामांची जाणीव

महिला बुद्धिमान व समजदार असून, अग्रवालसोबत ठेवलेल्या संबंधाचे काय परिणाम होतील, याची जाणीव तिला होती. ती दोन वर्षे अग्रवालसोबत होती. ती अग्रवालच्या खोट्या वचनामुळे प्रभावित झाल्याचे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Consensual sex isn't rape, boyfriend acquitted: High Court.

Web Summary : Nagpur High Court acquitted a man accused of rape, stating consensual sex cannot be termed rape. The woman, a divorcee, alleged the boyfriend promised marriage but repeatedly raped her. The court noted her awareness of the relationship's consequences.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालय