शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:26 IST

कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देपक्षात इनकमिंग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेसचा १३४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष विकास ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, उपाध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, माजी विश्वस्त अनंत घारड, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, माजी आ. यशवंत बाजीराव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, जयंत लुटे, संदेश सिंगलकर,नंदा पराते,रमेश पुणेकर, नितीश ग्वालवंशी,रामगोविंद खोब्रागडे, विवेक निकोसे, पंकज लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णरावजी पांडव यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सुमारे ७० कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणारशहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ८ जानेवारी रोजी दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी येथे दर्शन करून सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करुन रामटेक येथे जाहीर सभा होईल. १२ जानेवारी रोजी यात्रा नागपुरात दाखल होईल. १३ जानेवारी रोजी नागपुरात संघटनात्मक बैठक होईल. तीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अ.भा. काँग्रेस कमिटीचे नेते सहभागी होतील. या नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण