शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस फुंकणार लोकसभेचे रणशिंग; ‘हैं तैयार हम’ महारॅली, परिवर्तनाचा संदेश देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 05:22 IST

रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरात ‘हैं तैयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे देशभरातील नेते याप्रसंगी उपस्थित राहतील. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभास्थळी पत्रपरिषद घेत महारॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान धोक्यात आहे. ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. महारॅलीतून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले. 

जाती-धर्माच्या आडून लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला जात आहे.  विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. 

टॅग्स :congressकाँग्रेस