लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राजस्थानच्या राज्यपालांवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप लावत काँग्रेसने निदर्शने केली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन सादर करीत संवैधानिक संस्थांचा दुरुपयोग बंद करण्याची मागणी करण्यात आली.
काँग्रेसची भाजपविरुद्ध राजभवनासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:24 IST
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसची भाजपविरुद्ध राजभवनासमोर निदर्शने
ठळक मुद्देराजस्थानमधील घटनाक्रमाचा निषेध : राज्यपालांना निवेदन सादर