शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस ना संपली, ना संपणार; देवडिया भवनात स्थापनादिनी कार्यकर्त्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 21:39 IST

Nagpur News काँग्रेस ना संपली, ना संपणार. ही विचारधारा जपण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नांची पराकाष्टा करणार, असा निर्धार काँग्रेसच्या स्थापनादिनी करण्यात आला.

नागपूर : काँग्रेस फक्त एक राजकीय पक्ष नाही तर एक विचारधारा आहे. ज्या पक्षासमोर ब्रिटिश सरकारने गुडघे टेकले त्या पक्षाला संपवणे कधीच शक्य नाही. काँग्रेस ना संपली, ना संपणार. ही विचारधारा जपण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नांची पराकाष्टा करणार, असा निर्धार काँग्रेसच्या स्थापनादिनी करण्यात आला.

देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेसचा १३७वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. बबनराव तायवाडे, उद्योग सेलचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा, डाॅ. गजराज हटेवार, बंडोपंत टेभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, सेवादलाचे रामगोविंद खोंबाडगे, प्रवीण आगरे, महेश श्रीवास आदी उपस्थित होते.

यावेळी विलास मुत्तेमवार यांनी काँग्रेसचा इतिहास मांडला. काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवा व नागपूर शहरातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. अतुल कोटेचा यांनी महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येकाने मिशन मोडवर काम करण्याची गरज व्यक्त केली.

नागपूर ग्रामीणमध्ये ध्वजारोहण

- जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या उपस्थितीत स्थापना दिन कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, माजी आ. एस.क्यू. जामा, तक्षशिला वाघधरे, संजय मेश्राम, तुळशीराम काळमेघ, वसंतराव गाडगे, अवंतिका लेकुरवाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस