शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

कॉंग्रेस आघाडीकडे नेता आणि नीती नाही : अमित शहा यांचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 8:17 PM

कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अभाव आहे, या शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली. नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता शहा यांच्या सभेने झाली. यावेळी शहा बोलत होते.

ठळक मुद्देकाश्मीरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कॉंग्रेससह विविध पक्षांचा समावेश असलेली महाआघाडी म्हणजे एक महाभेसळ आहे. कॉंग्रेस आघाडीतील पक्षांचे नेते शरद पवार व ममता बॅनर्जी हे राहुल गांधी यांना नेता मानायला तयार नाही. वास्तवात कॉंग्रेस आघाडीकडे नेता, नीती या दोन्ही गोष्टी नाही आणि सिद्धांताचा अभाव आहे, या शब्दात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली. नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता शहा यांच्या सभेने झाली. यावेळी शहा बोलत होते. 

पूर्व नागपुरातील कच्छी विसा मैदान येथे आयोजित या सभेला नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खा.विकास महात्मे, रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा.कृपाल तुमाने, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते. महाआघाडीतील नेते केवळ सत्तेसाठी एकमेकांसोबत आले आहेत. मात्र सत्तास्वार्थासाठी एकत्रित आलेले लोक देशाचे हित साधू शकत नाहीत. मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशाला सुरक्षित केले. पुलवामा हल्ल्यानंतर देशात तीव्र भावना होत्या. कॉंग्रेसच्या पंतप्रधानांसारखे मौन न साधता मोदींनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर देशात उत्साह होता. मात्र पाकिस्तान व कॉंग्रेसच्या खेम्यात दु:खाचे वातावरण होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधींना दहशतवाद्यांसोबत ‘इलू इलू’ करू द्या, पण आम्ही गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ. पाकविरोधात ‘इट का जवाब पत्थर’ अशीच आमची भूमिका आहे, असे अमित शहा म्हणाले. सत्तेवर आल्यानंतर आम्ही कलम ३७० हटवू ही आमची भूमिका आहे. असे झाले तर काश्मीर देशापासून वेगळा होईल, असे काश्मीरचे नेते म्हणत आहेत. काश्मीर ही ओमर अब्दुल्ला यांच्या वडिलांच्या मालकीची भूमी नाही. आम्ही सरकारमध्ये असो किंवा विरोधात, काश्मीरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राहुल गांधी यांनी हिंदूची माफी मागावीसमझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणात असीमानंद यांच्यासह इतर आरोपींची मुक्तता झाली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणाला हिंदू दहशतवाद असे नाव दिले व जगभरात हिंदू समाजाची बदनामी केली. राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या शब्दात अमित शहा यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली.गडकरींनी कॉंग्रेसहून जास्त विकास केलायावेळी अमित शहा यांनी नितीन गडकरी यांचे काम कॉंग्रेसहून जास्त चांगले असल्याचे प्रतिपादन केले. नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात दर्जेदार पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. अडीच पट अधिक रस्ते त्यांनी बांधले. विकासाबाबत नितीन गडकरी समर्पित नेते आहेत. कॉंग्रेसहून जास्त विकास गडकरींनी केला. हे लहान मुलगादेखील सांगेल. नागपूर व आजूबाजूच्या क्षेत्रात त्यांनी डोळे दिपवून टाकणारा विकास केला आहे. गडकरींच्या विकासकामांमुळे नागपूरमध्ये काँग्रेसला उमेदवार नाही मिळाला व त्यांना उमेदवार आयात करण्याची वेळ आली, असा चिमटादेखील शहा यांनी काढला.शेतकरी आत्महत्या थांबविणार, रोजगार वाढविणार : गडकरी 
प्रचाराच्या अखेरच्या भाषणात नितीन गडकरी यांनी नागपूरसह विदर्भाच्या विकासाचे ‘ब्ल्यू प्रिंट’चा मांडले. पुढील वर्षभरात नागपुरात २५ हजार व त्यानंतरच्या चार वर्षांत ५० हजार रोजगारांची निर्मिती होईल. तसेच विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून सिंचन क्षमता वाढविण्यात येईल. विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी काम करण्यात येईल. नागपुरात ‘ऑटोमोबाईल क्लस्टर’ तयार करण्यात येईल व विदर्भातील महत्त्वाची शहरे विकासाची केंद्र बनतील. नागपूर व विदर्भाला ‘ग्रोथ इंजिन’ बनवू, असा संकल्प गडकरी यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसने अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक समाजाचा केवळ उपयोग केला व काम झाल्यावर त्यांना बाजूला सारले. कथनी आणि करणी यात अंतर असते. कॉंग्रेसने दिलेल्या आर्थिक नीतीमुळे देश व जनता विकासापासून दूर राहिली. प्रत्यक्षात रोजगार देणाऱ्या आर्थिक धोरणाची आवश्यकता आहे. आम्ही त्या दिशेनेच कार्य करत आहोत. आम्ही गरीबांच्या नेमक्या समस्या जाणल्या व त्यानंतर विविध योजना लागू गेल्या, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

भाजपा-सेना जातीयवादी नाहीत : आठवलेमी अ़नेक वर्षे कॉंग्रेससोबत होतो. मात्र त्यांनी मला फसवलं. विरोधी पक्षांनी भाजपा व शिवसेनेची चुकीची प्रतिमा जनतेसमोर उभी केली आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष जातीयवादी नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असो किंवा दीक्षाभूमीचा विकास, भाजपा सरकारने तत्परता दाखविली आहे. विरोधी पक्षातील नेते खोटे आरोप करुन भाजप-सेनेला बदनाम करत असल्याचा दावा आठवले यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019