शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज नागपुरात दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:33 IST

प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज, गुरुवारी नागपूर विभागात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांचा सहभाग : रामटेक येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज, गुरुवारी नागपूर विभागात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे उत्साहात पूर्ण झाले आहेत. गुरुवारी सकाळी १० वा. दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरू होईल. दुपारी १२ वाजता कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून दुपारी २.३० रामटेक येथे पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर तुमसर (जि. भंडारा) येथे यात्रेचे स्वागत होईल. सायंकाळी ६ वा. तिरोडा येथे जाहीर सभा होईल.शुक्रवारी गोंदिया, सडक अजुर्नी, साकोली येथे यात्रा पोहोचेल. १२ जानेवारी रोजी भंडारा, चिमूर येथे सभा होईल. यानंतर वरोरा येथे यात्रा पोहोचेल. सायंकाळी चंद्रपूर येथे रॅली व जाहीर सभा होणार आहे. रविवार, १३ जानेवारी रोजी गडचिरोली, ब्रम्हपुरी येथे यात्रा येऊन पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ६ वाजता नागपूर येथे होईल. या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.नेते, कार्यकर्ते सज्ज नागपुरातील सद्भावना लॉन, पोलीस लाईन टाकळी येथे जनसंघर्ष यांत्रेचा समारोपीय सभेच्या तयारीसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात आढावा बैठक घेण्यात आली. ब्लॉक अध्यक्षांना व पदाधिकारी यांना विविध जबाबदारीचे वाटप करण्यात आले. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाकरिता किमान तीन हजार लोकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राnagpurनागपूर