शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बेरोजगारीला काँग्रेसच जबाबदार, मोदी सरकारने 32 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज दिलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:17 IST

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला

नागपूर - देशात फक्त काँग्रेसमुळेच गरिबी आली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काहीही फायदा झाला नाही, असे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, कर्नाटक हिजाब वादावर बोलताना शाळेत जो युनिफॉर्म आहे, तोच घाला, बुरखा नको, असेही आठवले म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले नसते, असे म्हणत भाजपच्या विकासकामांची आणि रोजगार उपलब्ध केल्याची माहितीही आठवलेंनी दिली. देशात मुद्रा योजनेतून ३२ कोटी लोकांना कर्ज मिळाले असून या कर्जाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, यंदाच्या वर्षात ६० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे प्रावधान बजेटमध्ये आहे, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेला पुन्हा एकदा आवाहन 

शिवसेनेच्या भल्यासाठी आपण त्यांना आवाहन केले की, भाजपासोबत या आपले मित्र आहेत. विचार करायचा की नाही ही त्यांची इच्छा आहे. पण, लवकर बरे व्हा आणि आमच्यासोबत या, आवाहन आठवलेंनी शिवसेनेला केले आहे. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे मन करुन कायदे मागे घेतले. त्यामुळे, सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मोदींना असून पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळाले, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसUnemploymentबेरोजगारी