शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेविका गार्गी चोपरा यांच्यावर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपाचे नऊ तर बसपाचा एक सभापती निवडून आला. १० नगरसेवक असूनही बसपाला सभापतिपद मिळाले तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसपाला पाठिंबा दिला. मंगळवारी झोनमध्येही काँग्रेस व बसपा एकत्र आले. परंतु काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी ...

ठळक मुद्देझोन सभापतीच्या निवडणुकीत अनुपस्थित : भाजपाचा सभापती निवडून येण्याला मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन सभापतींच्या निवडणुकीत भाजपाचे नऊ तर बसपाचा एक सभापती निवडून आला. १० नगरसेवक असूनही बसपाला सभापतिपद मिळाले तर २९ सदस्य असलेल्या काँग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. आसीनगर झोनमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी बसपाला पाठिंबा दिला. मंगळवारी झोनमध्येही काँग्रेस व बसपा एकत्र आले. परंतु काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी प्रशात चोपरा अनुपस्थित राहिल्याने येथे भाजपाच्या संगीतागिऱ्हे एक मताने विजयी झाल्या. अनुपस्थित राहून त्यांनी भाजपाला मदत केल्याने काँग्रेस गार्गी चोपरा यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.मंगळवारी झोनमध्ये भाजपा ८, काँग्रेस ५ व बसपा ३ असे संख्याबळ आहे. परंतु भाजपाच्या संगीता गिऱ्हे एक मताने विजयी झाल्या. गिऱ्हे यांना आठ तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना सात मते मिळाली. काँग्रेसच्या ४ नगरसेवकांनी वालदे यांना मतदान केले. सभापतिपदासाठी काँग्रेसच्या रश्मी धुर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गार्गी चोपरा अनुपस्थित असल्याने धुर्वे यांनी उमेदवारी मागे घेतली. अन्यथा बसपाच्या मदतीने काँग्रेस उमेदवारालाही आठ मते मिळाली असती. ईश्वर चिठ्ठीत काँग्रेस उमेदवाराला निवडून येण्याची संधी होती.महापालिका निवडणुकीपूर्वी गार्गी चोपरा यांचे पती डॉ. प्रशांत चोपरा काँग्रेसमध्ये होते. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येण्यासाठी गार्गी चोपरा यांनी अनुपस्थित राहून मदत केल्याचा आरोप काँग्रेसमधूनच होत आहे.आसीनगर झोनमध्ये १६ नगरसेवक आहेत. यात भाजपा तीन, बसपा सात तर काँग्रेसच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. येथे काँग्रेसने बसपाला मदत केल्याने मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपाला एकत्रित निवडणूक लढता आली असती. देशभरातील राजकीय घडामोडी विचारात घेता नागपुरातही काँग्रेस - बसपाला एकत्र येण्यात अडचण नव्हती. परंतु गार्गी चोपरा यांच्यामुळे यात बाधा निर्माण झाल्याची चर्चा आहे.चोपरा शहरात नव्हत्यासभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निर्देशानुसार मतदान करावे, यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र गार्गी चोपरा नागपुरात नव्हत्या. त्यामुळे त्या मतदानासाठी उपस्थित नव्हत्या. भाजपाला रोखण्यासाठी आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये काँग्रेस व बसपाने एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु यात यश आले नाही.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

 

टॅग्स :congressकाँग्रेसNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका