शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण व लहान व्यापाऱ्यांच्या खासगी जागेतील दुकानावर हातोडा, निकृष्ट दर्जाची सिमेंट रोडची कामे, मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास, बंद पथदिवे, अनियमित बससेवा व पाणीपुरवठ्याची समस्या तसेच वस्त्यांतील धार्मिक स्थळांवर ...

ठळक मुद्देसत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण अन् लहान व्यापाऱ्यांच्या दुकानावर बुलडोजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण व लहान व्यापाऱ्यांच्या खासगी जागेतील दुकानावर हातोडा, निकृष्ट दर्जाची सिमेंट रोडची कामे, मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास, बंद पथदिवे, अनियमित बससेवा व पाणीपुरवठ्याची समस्या तसेच वस्त्यांतील धार्मिक स्थळांवर होत असलेली कारवाई अशा ज्वलंत समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सोमवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.रस्ते रुंदीकरणाच्या नावावर व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता कायद्याचा धाक दाखवून व्यापाऱ्यांची दुकानेही जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र सत्तापक्षातील नगरसेवकांच्या अतिक्रमणावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. कारवाईत होत असलेला भेदभाव थांबवून अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी विकास ठाक रे यांनी महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्याक डे केली. शिष्टमंडळात उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, नरेश गावंडे, संजय महाकाळकर, नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालबंशी, दर्शनी धवड, माजी नगरसेवक मनोज साबळे, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, डॉ.मनोहर तांबुलकर, जयाल जैसनानी, प्रशांत धवड, रमण पैगवार, धरम पाटील, इर्शाद अली, देवा उसरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.पावसाळ्याच्या दिवसातही शहरातील काही वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तक्रार करूनही नागरिकांना न्याय मिळत नाही.शहरातील अनेक मार्गांवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या अंधारात चोरीचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यात यावा. शहर बससेवा सुरळीत चालावी यासाठी आॅपरेटर बदलण्यात आला; परंतु परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. शहरातील कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अद्याप नागरिकांना हिरव्या व निळ्या डस्टबीन मिळाल्या नसल्याचे विकास ठाकरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले.सत्ताधारी नगरसेवकांच्या अतिक्रमणाला अभयगोपालनगर भागात भाजपाचे नगरसेवक प्रमोद तभाने यांनी वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. असे असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. सोमवारी लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने भाजपाचे नगरसेवक संदीप गवई यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली नाही. मात्र त्यांच्या बाजूच्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावर हातोडा चालविला. सत्ताधारीनगरसेवकांच्या अतिक्रमणाला अभय अन् सामान्यांच्या बांधकामावर बुलडोझर हा प्रकार बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाईअनधिकृत धार्मिक स्थळावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुासर कारवाई सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा करता येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. नगरसेवकांच्या निधीत कपात केलेली नाही. प्रशासकीय शिस्त लागावी यासाठी परिपत्रक काढल्याची माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन