काँग्रेस कमिटीतर्फे अभिनेत्री पायल रोहतगीविरुद्ध पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST2021-09-02T04:18:08+5:302021-09-02T04:18:08+5:30

नागपूर : अभिनेत्री पायल रोहतगी हिने महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्याबद्दल खोटी, दिशाभूल करणारी, अफवा पसरविणारी माहिती तसेच ...

Congress committee lodges complaint against actress Payal Rohatgi | काँग्रेस कमिटीतर्फे अभिनेत्री पायल रोहतगीविरुद्ध पोलिसात तक्रार

काँग्रेस कमिटीतर्फे अभिनेत्री पायल रोहतगीविरुद्ध पोलिसात तक्रार

नागपूर : अभिनेत्री पायल रोहतगी हिने महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्याबद्दल खोटी, दिशाभूल करणारी, अफवा पसरविणारी माहिती तसेच अपमानास्पद आणि प्रक्षोभक वक्तव्य असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तिने इंदिरा गांधी यांच्यावरही सोशल मीडियातून आरोप केले. तिच्या या कृत्यामुळे समस्त काँग्रेसजनांच्या भावनांना ठेच पोहचली आहे. इतिहासातील वस्तुस्थितीचे अवास्तव व अपमानास्पद विद्रुपीकरण करून समाजात द्वेष, शत्रूता, सूडाची भावना निर्माण करीत असल्याने तिच्या विरोधात भादंविच्या कलम १५३ (अ), ५०४, ५०५ (१), ५०५ (२) अन्वये तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यामार्फत सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार बुधवारी करण्यात आली. पायल रोहतगीला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकर, असंघटित कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव चंद्रकांत वासनिक, सचिव नीलेश खांडेकर, चंद्रकांत हिंगे, मनीष छल्लानी यांनी केली आहे.

Web Title: Congress committee lodges complaint against actress Payal Rohatgi