शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या तारखेवरून गोंधळ, विधानसभेत गदारोळ, भाजपा-विरोधक आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:49 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या तारखेऐवजी एकाच तारखेला साजरी करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी करताच विधानसभेत एकच गदारोळ झाला.राज्य सरकारने शिवजयंतीची १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. तर शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत असते. त्यामुळे वर्षातून दोनदा शिवजयंती साजरी होते. त्यात आ. हाळवणकर यांनी आज तिसरीच तारीख पुढे केली. शिवरायांचा जन्म ८ एप्रिल १६२७ रोजी झाला असून याला काही संशोधकांच्या संशोधनाचा पुरावा आहे. लोकभावनाही तीच आहे, असे सांगत सरकारने यावर तज्ज्ञांची एक समिती नेमून शिवजयंती एकाच दिवशी साजरी करावी, अशी मागणी हाळवणकर यांनी केली.काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वेलमध्ये धाव घेत हाळवणकरांची विधाने कामकाजातून काढण्याची मागणी केली. सरकारने १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केलेली असताना; आता नव्याने वाद कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यावर हाळवणकर यांचे हे वैयक्तिक मत असून सरकारची अधिकृत भूमिका नव्हे, असे सांगत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हाळवणकर यांची विधाने कामकाजातून काढण्यास नकार दिला. मात्र, अध्यक्षांच्या या निर्णयाने गोंधळात अधिकच भर पडली. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, अशी आग्रही भूमिका मांडली आणि शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दिला.गदारोळ बघून राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांना शांत करत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना राज्य शासनाने शिवरायांच्या जन्मतिथीबाबत इतिहासतज्ज्ञांची समिती नेमलेली होती. पुढे आघाडी सरकार आल्यानंतर या समितीच्या शिफारशीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाने निश्चित केलेली आहे. प्रत्येक मुख्यमंत्री १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर जाऊन राज्यातील समस्त जनतेच्या वतीने शिवरायांना अभिवादन करीत असतात. यावर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून भूमिका मांडावी. इथे घोळ निर्माण करू नये, असा सल्ला पवार यांनी दिल्यानंतर कामकाज सुरळीत झाले.

टॅग्स :nagpurनागपूर