शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्ती मुद्यावरून उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 20:31 IST

सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती न करण्याचे शासनाचे आदेश गुरुवारी धडकल्याने याचा फायदा २२६ अधिकाऱ्यांना झाला. त्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली. परंतु नियमांत बसत असतानाही ७० ते ८० अधिकाऱ्यांचे यादीत नावच नाही. यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीला घेऊन गोंधळ उडाला आहे.

ठळक मुद्देराज्यातील २२६ अधिकाऱ्यांचे वाढविले वय : ७० हून अधिकांना डावलल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती न करण्याचे शासनाचे आदेश गुरुवारी धडकल्याने याचा फायदा २२६ अधिकाऱ्यांना झाला. त्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली. परंतु नियमांत बसत असतानाही ७० ते ८० अधिकाऱ्यांचे यादीत नावच नाही. यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीला घेऊन गोंधळ उडाला आहे. एकाच पदावरील अधिकाऱ्यांसाठी दोन वेगवेगळे नियम लावण्यात आल्याने नाराज अधिकारी न्यायालयाची पायरी चढण्याच्या तयारीत आहेत.पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वरिष्ठ वेतनश्रेणी असणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३१ मे २०१५ पासून लागू करण्यात आलेला हा निर्णय ३१ मे २०१८ पर्यंतच होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागाची डॉक्टरांच्या वयाला घेऊन जोरदार चर्चा सुरू होती. परंतु ३१ मे उजाडला तरी सायंकाळपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. रात्री ७ वाजताच्या सुमारास अचानक शासनाचा निर्णय सर्व ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’वर फिरला. यात जे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत असे १३५ वैद्यकीय अधिकारी, ‘गट-अ’मधील ८२ अधिकारी व राज्य कामगार विमा योजनेतील ९ असे एकूण २२६ अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त न करण्याचे आदेश धडकले. यात वय वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर असल्याने पुढील आदेश येईपर्यंत किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत त्यांना शासन सेवेत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आदेशासोबतच २२६ अधिकाऱ्यांची यादीही जोडण्यात आली. परंतु ‘गट-अ’ मधील ७० ते ८० अधिकारी असे आहेत जे या नियमात बसत असतानाही यादीत त्यांचे नाव नाही. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. आपण नोकरीत आहोत किंवा नाही याला घेऊन गोंधळ उडाला आहे. यादीत नाव नसलेले अधिकारी न्यायालयात जाण्याची तयारी करीत असल्याचे बोलले जात आहे.यादीत नाव नसतानाही रुजू करून घेतलेकाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त झालेले व यादीत नाव नसलेल्या अधिकाऱ्यांना १ जून रोजी कामावर रुजू करून घेतले आहे. या संदर्भाचे पत्र उपसंचालकांना दिल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर