शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

फडणवीस-गडकरींपुढे आमदारांचा पेच : कुणाचे तिकीट कटणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:42 IST

नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या परफॉर्मन्सचेही ऑडिट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. शिवसेनेसोबत युती झाल्यास शिवसेनेचा विशिष्ट मतदारसंघांसाठी असलेला आग्रह व लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्सचे भाजपने केलेले ऑडिट या मुद्यांवर काही आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागपूर शहरातील सहाही मतदारसंघ व ग्रामीणमधील सावनेर वगळता उर्वरित पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. यावेळी शिवसेनेने युतीत ग्रामीणमधील रामटेक, काटोल व सावनेर तर शहरातील पूर्व व दक्षिण नागपूर अशा एकूण पाच जागांची मागणी भाजपकडे केली आहे. युती झाली तर किमान एक- दोन जागा तरी शिवसेनेसाठी सोडाव्या लागतील. त्यामुळे संबंधित जागेवर असलेल्या विद्यमान भाजप आमदाराला नारळ मिळणे निश्चित आहे. सेनेच्या वाटाघाटीत मतदारसंघ कायम राखण्यात भाजपच्या श्रेष्ठींना यश आलेही तरी आमदारांवरील संकट टळले असे नाही. कारण, प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या आमदारांना पक्षांतर्गत तगड्या दावेदारीला सामोरे जावे लागत आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपूर वगळता शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले. उत्तर नागपुरात तर काँग्रेसला आघाडी मिळाली. मध्य उत्तर व दक्षिण नागपुरातील भाजपच्या मताधिक्यात घट झाली. शिवाय पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात काही आमदारांचा जनतेतील ग्राफ घसरल्याचे समोर आले आहे. शिवाय गेल्या १० ते १५ वर्षांपासून उमेदवारीसाठी वेटिंगवर असलेले इच्छुक उमेदवारही यावेळी ताकदीने समोर आले असून त्यांनी वैयक्तिक पातळीवर ‘कॅम्पेन’ सुरू केले आहे. मध्य नागपुरात हलबा समाजाचे प्राबल्य आहे. विद्यमान आमदारांना बदलायचे झाले तरी त्यांच्या जागी हलबा उमेदवार दिला तरच जागा वाचविता येईल, असा पक्षाचा अहवाल आहे.घटस्थापनेनंतर नागपूरचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेशी सुरू असलेली युतीची चर्चा व राज्यभरातील भाजपचे उमेदवार ठरविण्यात व्यस्त आहेत. नागपूरचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपसात चर्चा करून घेतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्थापनेनंतर फडणवीस-गडकरी हे दोन्ही नेते नागपूरच्या विषयावर बसतील व निर्णय घेतील. तोवर आमदारांची धाकधूक कायम राहणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीMLAआमदार