शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:31 IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातून या बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे स्वत: बैलबंडी चालवत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये हे बैलबंडीवरून घोषणा देत होते. या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या माध्यमातून मख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजाभाऊ टांकसाळे, सलील देशमुख, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे पाटील, वेदप्रकाश आर्य आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सामान्यांचा अंत पाहू नका : जयंत पाटीलआंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना राज्य व केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे देशात सर्वाधिक पेट्रोल-डिझेलचे भाव आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे. ही दरवाढ तातडीने कमी करावी. सामान्यांचा अंत पाहू नका, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

टॅग्स :Petrolपेट्रोलagitationआंदोलन