शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातील हालचालींनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 07:00 IST

जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर सायंकाळच्या वेळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, ही साधारण प्रक्रिया असून चिंतेचे कुठलेही कारण नाही. शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.२३ जून रोजी अकोल्यापासून दक्षिणेकडे १२९ किमी अंतरावर झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलमध्ये तीव्रता ३.३ इतकी नोंदविली गेली. याच महिन्यात २ तारखेलासुद्धा ३.४ तीव्रता असलेल्या भूकंपाची नोंद झाली. विशेष म्हणजे १० जून रोजी मुंबईच्या पश्चिमेकडे ७८ किमी दूर ३.० तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली, तर गुजरातच्या राजकोट येथे १४ जूनला ५.३, १५ जूनला दोनदा ४.१ व ३.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

भूगर्भ सर्वेक्षण विभागा(जीएसआय)चे नागपूरचे संचालक विशाल साखरे यांच्या मते, या तीव्रतेच्या भूकंपामुळे कुठलाही धोका नाही. तीव्रता ६ किंवा ७ च्या वर असेल तर चिंतेचे कारण ठरू शकते. ही भूगर्भात होणारी साधारण प्रक्रिया आहे. भूगर्भातील खडकांच्या हालचालीतून फॉल्ट रिअ‍ॅक्शन झाल्याने ऊर्जा बाहेर आली व त्यामुळे हे धक्के जाणवले. पण पृथ्वीच्या आवरणात मोठा बदल जाणवत नसून हे मोठ्या भूकंपाला कारणीभूत नाहीत, असा दावा त्यांनी केला. हे धक्के प्राथमिक तरंगातून निर्माण झाले आहेत, जे सामान्य असतात. सेकंडरी आणि सरफेस तरंग धोकादायक ठरतात; पण असे तरंग निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही. हो पण सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र नाही भूकंपप्रवणजीएसआयच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राची भूमी कुठल्याच अंगाने भूकंपप्रवण नाही. केवळ कोयना पात्राच्या भागात थोड्या फार हालचाली होत असतात. त्यामुळे १९९३ साली लातूर, किल्लारीला भूकंप आला होता. उर्वरित कुठेही अशी शक्यता नाही. याशिवाय जवळ असलेल्या गुजरातच्या कच्छचा प्रदेश भूकंपप्रवण आहे. देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्य हे भूकंपप्रवण परिसरात येतात. मात्र या काही वर्षांत मोठा आघात झाला नाही, असे विशाल साखरे यांनी सांगितले. भूगर्भातील ऊर्जा बाहेर पडल्याने हा प्रकार घडला असून ही सामान्य बाब आहे. जीएसआयचे भूगर्भशास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र नागरिकांनी सतर्कता ठेवावी आणि सुरक्षेचे नियम अंगिकरावेत. आपत्ती निवारण दलानेही याबाबत जनजागृती करावी.- विशाल साखरे, संचालक, जीएसआय, नागपूर

 

टॅग्स :Earthquakeभूकंप