शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसवर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:55 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देअस्वच्छतेत वाढ : नगरसेवकांना विचारले तुम्ही काय करताय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शहरातील अस्वच्छतेसंदर्भातील प्रकरणावर सुनावणी करताना सध्या सर्वांना घाबरवून सोडलेल्या स्क्रब टायफस आजारावर चिंता व्यक्त केली. तसेच, असे जीवघेणे आजार पसरू नये यासाठी शहरामध्ये सर्वत्र स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पूनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आग्रे यांच्या वकील अ‍ॅड. सेजल लाखाणी यांनी कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असल्याचे सांगितले तसेच अस्वच्छतेमुळे डासांची संख्या व विविध आजार वाढल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने गेल्या काही महिन्यांत अनेकांचे प्राण घेणाऱ्या स्क्रब टायफस आजाराचा उल्लेख केला. अस्वच्छता अशा अनेक आजारांचे मूळ कारण आहे. स्थानिक प्रशासनासह नगरसेवकांनीही याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडवणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. शहरातील नगरसेवक याकरिता काय करीत आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला व नगरसेवकांना यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.स्वच्छ व आरोग्यवर्धक वातावरण हा नागरिकांचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. जैविक व अजैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्या जात नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHealthआरोग्य