शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नागपुरातील डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची ५० लाखात तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:21 IST

ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची  मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तब्बल ५० लाख रुपयांत तडजोड झाली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टातील प्रकरणहुंड्यासाठी छळाचा खटला रद्द

आॅनलाईन लोकमतनागपूर : ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यामधील वादाची  मध्यस्थी प्रक्रियेद्वारे तब्बल ५० लाख रुपयांत तडजोड झाली आहे. पतीने पत्नीला ही रक्कम दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही तडजोड मान्य करून पतीविरुद्धचा हुंड्यासाठी छळ व इतर गुन्ह्यांचा खटला रद्द केला आहे.हे दाम्पत्य मनीषनगर येथील रहिवासी आहे. लग्नानंतर ते काही महिने गुण्यागोविंदाने नांदले. त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. दरम्यान, सोनेगाव पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध भादंविच्या कलम ४९८-अ, ५०४, ५०६(२) व ३२३ अंतर्गत एफआयआर नोंदविला. तसेच, तपासानंतर जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला प्रलंबित असताना या दाम्पत्याने मध्यस्थी प्रक्रियेद्वारे सहमतीने वाद मिटविला. पतीने पत्नीला ५० लाख रुपये देण्याचे तर, पत्नीने पतीविरुद्धचा खटला मागे घेण्याचे मान्य केले. पतीने ही रक्कम कुटुंब न्यायालयात जमा केली. त्यानंतर दोघांनी खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला व वाद सहमतीने मिटविण्याच्या कराराची मूळ प्रत सादर केली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ‘गियानसिंग’ प्रकरणातील निर्णय व अन्य विविध बाबी लक्षात घेता दाम्पत्याचा अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयातील प्रलंबित खटला रद्द केला.